आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vyapamn Scandal Of Mp, Another Person's Death At Odisha

व्यापमं घोटाळा हत्यासत्र सुरूच; निरीक्षक अधिकाऱ्याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- व्यापमं घोटाळ्याशी संबंधित दोन परीक्षांचे पर्यवेक्षणाचे काम करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याचा शनिवारी गूढरीत्या मृत्यू झाल्याचे उजेडात आले. विजय बहादूर असे त्यांचे नाव असून ते वन विभागात कार्यरत होते.

१५ ऑक्टोबर रोजी ओडिशातील झारसुगुडा येथील रेल्वे रुळावर ते मृतावस्थेत आढळून आले होते. काँग्रेसने या मुद्द्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सीबीआयने आपल्या निगराणीखाली तपास सुरू केल्यानंतर एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याबद्दल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर हे मृत्यू प्रकरण समोर आले आहे. बहादूर यांची भूमिका पर्यवेक्षक एवढीच मर्यादित होती की ते एखाद्या प्रकरणात आरोपी किंवा साक्षीदार होते, हे स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु काँग्रेसला आयते कोलित मिळाले आहे. व्यापम घोटाळ्यातील मृत्यूची साखळी थांबणार नाही, हेच बहादूर यांच्या मृत्यूने सिद्ध केले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात यावा, असे काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे.