आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waiting For Naked Statues At Khajuraho To Be Covered Nayantara Sahgal

मी वाट पाहात आहे, खजुराहोतील मुर्तींना केव्हा साडी नेसवली जाते - नयनतारा सहगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर सर्वात आधी पुरस्कार परत करणाऱ्यांपैकी एक असलेल्या नयनतारा सहगल यांनी पुन्हा एकदा देशात असहिष्णुता वाढली असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या देशात असहिष्णुता एवढी वाढली आहे, की आता मी वाट पाहात आहे, सांस्कृतिक मंत्री खजुराहोतील नग्न मुर्तींना केव्हा साडी नेसवतात. त्यासोबतच मी पुरस्कार परत स्विकारला असल्याचा वावड्या कशा उठल्या याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

कोलकाता येथे आयोजित साहित्य उत्सवात सहगल म्हणाल्या, 'हिंदुत्वाला पुढे करत ज्या पद्धतीने देशात घटना घडत आहे, त्या पाहाता आता मी वाट पाहात आहे, की खजुराहोतील नग्न मुर्तींना सांस्कृतिक मंत्री केव्हा साड्या नेसवतात. कारण त्या फार नाट्यमय पद्धतीने संभोगाचे प्रदर्शन करत आहेत.'

नयनतारा सहगल यांनी वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. तो त्यांनी परत घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सहगल म्हणाल्या, 'मला माहित नाही अशा वावड्या कोण उठवत आहे. साहित्य अकादमीने मला फोन करुन पुरस्कार परत घेण्याची कोणतीही तरतूद आमच्याकडे नाही असे कळविले आणि मी पाठवलेले पुरस्काराचे चेक परत करत असल्याचे सांगितले.'

पुरस्कार परत घेतले जात नाही
अकादमीने घेतलेल्या या निर्णयाच्या वेळेवर सहगल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, 'याचा संबंध रोहित वेमुलाच्या आत्महत्येशी आहे. मी ती हत्याच समजते. कारण त्याला आत्महत्येला मजबूर केले गेले.'

'पुरस्कार वापसी'चे नेतृत्व करणाऱ्या सहगल यांनी सांगितले, की त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुरस्काराचा 21 हजार रुपयांचा चेक अकादमीला परत केला होता. त्यांनी तो त्यांच्या खात्यात जमा केला नाही. आता तो मान्य केला जात नाही. सहगल यांना 1986 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्यांना ताम्रपत्र आणि 21 हजारांचा पुरस्कार देण्यात आला होता. सहगल यांनी पुरस्काराची रक्कम परत केल्यानंतर अकादमीकडून म्हटले गेले होते, त्यांनी फक्त पैसे परत केले त्यावरील व्याज कुठे आहे ? यामुळे निराश झालेल्या सहगल यांनी अकादमीला पुन्हा एक लाख रुपयांचा चेक पाठवला होता. तो देखिल तेव्हापासून अकादमीकडे पडून आहे. आता ते अचानक सांगत आहेत, की आमची तशी पद्धत नाही. हा त्यांचा प्रश्न असल्याच्या सहगल म्हणाल्या.