आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wake Up Consumer : Get Free Insurance With Gas Connection

जागो ग्राहक जागो: गॅस कनेक्शनसोबतच मिळतो मोफत विमाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतियाळा - गॅसच्या कनेक्शनसोबतच मोफत विमा संरक्षणाचाही लाभ दिला जातो. कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु कनेक्शन घेतानाच तुमचा विमाही उतरवलेला असतो. कंपनीखेरीज वितरकालाही थर्ड पार्टी इन्शुरन्स काढावा लागतो. सिलिंडर दुर्घटना झाल्यास माणसी 10 लाखांपर्यंत दावा मिळू शकतो. सामुहिक दुर्घटना झाल्यास दाव्याची रक्कम 50 लाखांपर्यंत जाऊ शकते.
तथापि, माहिती नसल्याने लोक फायदा घेऊ शकत नाहीत. कंपन्यांकडूनही माहिती दिली जात नाही. माहिती अधिकार मंचाकडे केलेल्या चौकशीत ही बाब उघड झाली आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या या पॉलिसीचे नाव पब्लिक लायबिलिटी पॉलिसी असे आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वेबसाइटवरही त्याची प्रत आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलिय या तिन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी ही पॉलिसी 2 मे 2013 ते 1 मे 2014 या काळासाठी घेतली आहे. कंपन्यांनी 5 कोटी 84 लाख 27 हजार 200 रुपयांचा प्रीमियमही भरलेला आहे.
शारीरिक हानी व विमा रक्कम
* पूर्णपणे जायबंदी झाल्यास 100%
* दोन्ही कान बहिरे झाल्यास50%
* हाताचा अंगठा, चार बोटे तुटल्यास 40%
1 लाख उपचार खर्च
3.5 लाख गॅस ग्राहक औरंगाबादेत
काय करावे लागेल : दुर्घटना झाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात रिपोर्ट दाखल करावा लागेल. पोलिस रिपोर्ट, पॉलिसीच्या प्रतीसह नुकसानीचा तपशील इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात सादर करावा लागेल.
ग्राहकांमध्ये जागृती हवी
माहिती नसल्याने ग्राहक विम्याचा लाभ घेत नाहीत. जागरूकतेसाठी आम्ही पेट्रोलियम मंत्रालयाला मोहीम आखण्याचे आवाहन केले आहे. दीपचंद गुप्ता, जनरल सेक्रेटरी, माहिती अधिकार मंच