आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार रोखण्यासाठी तरुणींनी बनवली खास जिन्स, केवळ 200 रुपयांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : जिन्स दाखवताना दीक्षा (उजवीकडे) आणि अंजली
1. छेडछाड झाल्यास बटन बादताच पोलिसांना जाणार कॉल
२. तीन महिने करता येईल जिन्सचा वापर

वाराणसी - येथील दोन मुलींनी तरुणींचे बलात्कारापासून संरक्षण करणारी अशी एक अनोखी जिन्स तयार केली आहे. दीक्षा पाठक आणि अंजली श्रीवास्तव नावाच्या या दोन तरुणींनी तयार केलेल्या या जिन्समध्ये वॉकी टॉकी डिव्हाइस लावलेले आहे. त्याला बटनही लावण्यात आलेले असून छेडछाड, अपहरण किंवा बलात्काराचा प्रयत्न होताच याचे बटन दाबल्यास पोलिस हेल्पलाईन क्रमांकावर अ‍ॅटोमॅटिक कॉल जाईल. त्यानंतर पोलिस सर्व्हिलंसद्वारे घटनास्थळ ट्रॅक करू शकतील.
दीक्षा ही कंप्युटर सायन्सची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील ड्रायव्हर आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी मोठे करायचे या इराद्याने हा प्रयत्न केल्याचे ती म्हणाली. दीक्षाला तिची मैत्रिण अंजलीने यासाठी सहकार्य केले. या जिन्ससाठी या दोघींना केवळ 200 रुपये खर्च आला.

जिन्सची वैशिष्ट्ये
या जिन्समध्ये एक सेंसॉर माइक लावण्यात आला आहे. त्याची फ्रिक्वेंसी अत्यंत गतीमान आहे. सर्किटमध्ये अत्यंत साध्या अशा मोबाइल चीपचा वापर करण्यात आला आहे. त्यात एक इमर्जंसी नंबर सेट केला जातो. स्विच दाबताच संबंधित नंबरवर कॉल जातो. जोवर कॉल रिसीव्ह होत नाही, तोपर्यंत व्हायब्रेशन सुरुच राहते.

नेटवर्क नसेल तर पोलिसांना कॉल
नेटवर्क फेल झाल्यास पोलिसांना 100 क्रमांकावर कॉल जातो. त्यानंतर पोलिस सर्व्हिलंसच्या मदतीने घटनास्थळी पोहचू शकतात. ही जिन्स जास्तीत जास्त तीन महिने वापरता येते.

पुढे वाचा - डिव्हाइसमध्ये लवकरच लावणार कॅमेरे