आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतने गेटअप बदलला, 2 सप्टेंबरपर्यंत काठमांडूपासून 60 km दूर एका गावात केला मुक्काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहिमला 20 वर्षांची शिक्षा झाली त्या दिवशी हनीप्रीत जेलपर्यंत त्याला सोडायला गेली होती. - Divya Marathi
राम रहिमला 20 वर्षांची शिक्षा झाली त्या दिवशी हनीप्रीत जेलपर्यंत त्याला सोडायला गेली होती.
पंचकुला - साध्वी बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमची सर्वात जवळची त्याची कथित मानस कन्या हनीप्रीत कुठे आहे, याचा हरियाणा पोलिसांचे विशेष पथक कसून शोध घेत आहे. एसआयटीने राजस्थानातून अटक केलेल्या प्रदीप गोयलने हनीप्रीत नेपाळमध्ये असू शकते, असे सांगितले. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी काठमांडूमध्ये आपल्या सोर्सेसला संपर्क केला. त्यांना काठमांडूपासून 60 किलोमीटर अंतरावरील एका ठिकाणी पाठवण्यात आले. त्यांच्याकडे हनीप्रीतचे दोन फोटो दिले आहेत. गोयल हा राम रहिमचा निकटवर्तीय मानला जातो.  
 
हनीप्रीतसोबत 3-4 जण नवीन ठिकाणाचा शोध घेतात
- काठमांडूपासून 60 किलोमीटर अंतरावर चार जणांनी हनीप्रीतचा फोटो पाहून कन्फर्म केले की ती 2 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या शेजारी राहात होती, नंतर अचानक गायब झाली. 
- ही माहिती तत्काळ एसआयटीला देण्यात आली. त्यानतंर डीजीपींकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्याची परवानगी घेण्यात आली. 
- त्यासोबतच गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार हनीप्रीतसोबत तिचे खास मर्जीतील 3-4 जण आहेत. ते हनीप्रीतसाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत असतात. एका ठिकाणी काहीच दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या ठिकाणाचा शोध सुरु करतात. 
- राम रहिम तुरुंगात गेल्यानंतर फरार झालेल्या हनीप्रीतने संपूर्ण गेटअप चेंज केला आहे. आता ती स्वतःच्या कार ऐवजी टॅक्सीने प्रवास करत आहे. 
 
दंगलखोरांमध्ये पहिले नाव हनीप्रीतचे, दंगलखोर जीन्स -टीशर्टमध्ये 
- दुसरीकडे, हरियाणा पोलिसांनी पंचकुलामध्ये दंगल भडकवणाऱ्या 43 जणांची यादी आणि फोटो प्रसिद्ध केले आहे. यात सर्वात पहिले नाव हनीप्रीत तर दुसरे आदित्य इन्साचे आहे. 
- यांच्याशिवाय 41 जणांचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. मात्र त्यांचे नाव दिलेले नाही. 
- पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये बहुतेकांच्या हातात शस्त्र आहे आणि ते आक्रमक अंदाजात दिसत आहेत. 
- विशेष म्हणजे यातील बहुतेक दंगलकोरांचा पेहराव हा जीन्स, टी-शर्ट किंवा शर्ट-पँट असा आहे. यातील बहुतेक हे तरुण आहे. याउलट जेव्हा बाबाच्या समर्थनार्थ पंचकुलामध्ये लोक जमा होत होत त्यातील अधिकांश हे ज्येष्ठ नागरिक आणि कुर्ता-पायजमा अशा वेशातील होते. 
- दंगेखोर हे 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान समोर आले होते. याचवेळेत पंचकुलामध्ये दंगल उसळली होती. 
- दंगलीनंतर आदित्य इन्सा त्याचा मेव्हणा प्रकाश उर्फ विक्कीसह फरार झाला होता. तो अजूनही सापडलेला नाही. 
 
मोबाइलद्वारे अनेकांना अटक 
- पोलिसांनी 25 ऑगस्टला पंचकुलामधील सेक्टर-2 आणि 4 मध्ये अनेक संशयितांचे मोबाइल नंबर मिळवले. याच नंबरच्या आधारे पोलिसांनी कालपी येथून तीन जणांना अटक केली. यांना पंचकुला कोर्टात हजर करुन बाकी लोकांची ओळख पटवण्यासाठी कोठडी मागण्यात आली त्याला कोर्टाने मंजूरी दिली. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, हनीप्रीत - राम रहिमचे निवडक फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...