आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासमोर युद्ध हा शेवटचा पर्याय : दिग्विजय सिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - भारत व पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे युद्ध हा भारतासाठी शेवटचा पर्याय ठरेल, असे मत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानवर दबाव वाढवून चर्चेच्या पातळीवर समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. काही घडामोडींकडे बारकाईने बघण्याची वेळ आली आहे. आजवर सातत्याने आपला मित्र असलेला रशिया आता पाकिस्तानसोबत संयुक्त लष्करी सराव करू लागला आहे. पूर्वी कधीही असे घडले नव्हते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दृष्टीने या गोष्टी चिंता वाढवणाऱ्या आहेत, असे दिग्विजय म्हणाले. ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. काश्मीरमधील घडामोडी सर्वांसाठीच चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. दहशतवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत चर्चिला जात आहे.

काँग्रेसनेही मैदानात उतरावे : पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी काँग्रेसनेही व्यूहरचना करण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षाने एक योजना तयार करून मैदानात उतरायला हवे. खरे तर काँग्रेसने सरकारला अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या मुद्द्यांवर नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे दिग्विजय म्हणाले.

मोदीही तेच करू लागले : भाजप तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात अतिशय आक्रमक वक्तव्ये करत. परंतु मोदी आता पंतप्रधानपदावर अाहेत. सिंग यांच्याकडे अधिकार असताना ते जे काही करत होते, आता मोदी यांनाही तेच करावे लागत आहे.

उरीमागे मसूदचा हात : उरी हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहंमद असून संघटनेचा म्होरक्या अझर मसूद पाकिस्तानात मोकाट हिंडू लागला आहे. एनडीए सरकारच्या काळात विमान अपहरणाच्या प्रकरणात मसूदला सोडण्यात आले होते. काँग्रेस पक्षाने कारवायांत सामील असलेल्यांशी तडजोड केलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...