आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • War Over Social Media After Amir Khans Statement On Intolerance

#AamirKhan : केजरीवालांचा पाठिंबा तर अनुपम खेर यांची प्रश्नांची सरबत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी रात्री रामनाथ गोयंका अवॉर्डस् फंक्शनमध्ये बोलताना आमीर खान. - Divya Marathi
सोमवारी रात्री रामनाथ गोयंका अवॉर्डस् फंक्शनमध्ये बोलताना आमीर खान.
नवी दिल्ली - देशामध्ये असहिष्णुता वाढल्याच्या मुद्द्यावरून आमीर खानने केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवस शांत असलेल्या वादाला नवी फोडणी मिळाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमीर खानच्या वक्तव्याचे समर्थन केले. तर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आमीरवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सोशल मीडियावर सगळीकडे याच मुद्याची चर्चा आहे. #AamirKhan नंबर 1 वर ट्रेंडींग करत आहे. आमीरच्या बाजुने आणि विरोधात मोठ्या प्रमाणावर मते व्यक्त करण्यात येत आहेत.

केजरीवाल यांचा पाठिंबा
अरविंद केजरीवाल यांनी काल ट्विट करून म्हटले की, आमीर बोललेला प्रत्येक शब्द योग्य आहे. या मुद्यावर बोलल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, भाजपने शिव्या आणि धमक्यांच्या माध्यमातून आवाज दाबणे बंद करायला हवे. आता केंद्र सरकारने लोकांच्या सुरक्षिततेविषयी पाऊल उचलणे गरजेचे आहे.

अनुपम खेरचे आमीरला सवाल
आमीर खानने इनटॉलरन्सबाबत मत मांडल्यानंतर अनुपम खेर यांनी ट्विटवर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली.
> अनुपम खेर यांनी ट्विट केले, 'तुम्ही किरण यांना विचारले का की त्यांना भारत सोडून कोणत्या देशात जायचे आहे. याच देशाने तुम्हाला आमीर खान बनवले हे तुम्ही तिला सांगितले का?'
> अनुपम खेर यांनी विचारले की, डीअर आमीर खान, तुम्ही किरणला सांगितले का की, या देशात तुम्ही यापेक्षाही वाईट काळ अनुभवला आहे. पण तरीही तुम्ही कधीही देश सोडण्याचा विचार केला नाही.
> एका ट्विटमध्ये तर अनुपम खेर यांनी आमीर खानच्या भारत सरकारच्या ‘इनक्रेडिबल इंडिया' ची जाहिरात करण्याच्या मुद्यावरही सवाल उपस्थित केला. ते म्हणाले केवळ 7-8 महिन्यांमध्ये इनक्रेडिबल इंडिया हा तुमच्यासाठी असहिष्णु भारत कसा बनला.
> आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी आमीरला विचारले की, भारतात असहिष्णुता वाढली आहे असे मान्यही केले तरी येथे राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना तुम्ही काय सांगाल? त्यांनीही देश सोडावा की, सरकार बदलण्याची वाट पाहावी.
> आमिर खानचा टिव्ही शो 'सत्यमेव जयते' चा उल्लेख करत खेर यांनी विचारले की, सत्यमेव जयतेमध्ये तुम्ही वाईट सवयी आणि बाबींबाबत चर्चा करतात, तसेच धीर देण्याचे कामही करतात. याबाबतीतही तुम्ही भिती पसरवण्याऐवजी तेच करायला हवे.

आमीरचे वक्तव्य...
सोमवारी रात्री एका कार्यक्रमात आमीर म्हणाला होता की, देशातील वातावरण पाहून माझी बायको किरणने मला देश सोडण्याविषयी विचारले होते. तिला मुलांसाठी काळजी वाटत होती. आमीरने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केले.

आमीरने लेखक, कलाकार, वैज्ञानिक यांनी परत केलेल्या पुरस्काराचे समर्थन करत मी प्रत्येक प्रकारच्या अहिंसक विरोधाचा समर्थक असल्याचे स्पष्ट केले. जर तुम्ही हिंसक नसाल तर तुम्हाला विरोध करण्याचा हक्क आहे. जर तुम्ही कायदा हातात घेतला नाही तर कोणत्याही प्रकारे आंदोलन करू शकता. आमीरने असेही म्हटले होते की, क्रिएटिव्ह लोकांना असंतोष आणि नैराश्य दाखवण्यासाठी पुरस्कार परत करणे हा एक मार्ग आहे.
ट्विटरवर युद्ध...
आमीरच्या वक्तव्यानंतर ट्विटर वर युद्ध पेटले आहे. आमीरच्या बाजुने आणि विरोधातही मोठ्या प्रमाणावर ट्विट्स होत आहेत. पाहुयात त्यातील काही ट्विट्स....
Rajdeep Sardesai Verified account ‏@sardesairajdeep
And can we please allow @aamir_khan to express his opinion without labelling him or anyone. Jiyo Aur jeene do is what makes India great!

ashutosh Verified account ‏@ashutosh83B
Aamir Khan is perfectly justified in his views and those who are trashing him are not respecting the sensibilities of this country.

barkha dutt ‏@BDUTT
achcha chalo ab @aamir_khan ko bhi Pakistani jaane ko keh do? Those outspoken comments at #RNGAwards likely to have many in a twist !

Tarek Fatah ‏@TarekFatah 39m39 minutes ago Mumbai, Maharashtra
I don't blame @Aamir_Khan for saying, a Muslim can never have sword & Quran together. He's good man who hasn't studied any Islamic history.

Tarek Fatah ‏@TarekFatah 37m37 minutes ago Mumbai, Maharashtra
Dear @Aamir_Khan, u r a role model for Indians who, like me, admire u. Pls stay away from mixing Islam & politics & stick to yr social work

Ashoke Pandit ‏@ashokepandit
Now that @aamir_khan also feels we are an #IntolerantNation Let us now go all out and prove once for all that we are really intolerant.

Meenakashi Lekhi ‏@M_Lekhi 7m7 minutes ago
कितनी बेशर्मी से इजहार करते है यह ख़राब जो व्यापार करते है अगर मिल जाये दाम इनको तो मॉ का आँचल भी दाग दार करते है #Intolerance #AamirKhan
पुढे पाहा, ट्विटरवर या मुद्यावरून होत असलेल्या काही POST