आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री हॉस्टेलमध्‍ये येत होते मुलं, अब्रू वाचवून अशा पळाल्‍या मुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशातील सतना येथील महिला हॉस्‍टेलमध्‍ये राहणा-या मुलींना देहव्‍यापारात ढकलण्‍यासाठी प्रयत्‍न होत असल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. शुक्रवारी या हॉस्‍टेलमधून अापली अब्रू वाचविण्‍यासाठी दोन मुलींनी पळ काढला. दमोहच्‍या एसडीएम कोर्टात जजसमोर त्‍यांनी हा प्रकार कथन केला. रात्री हॉस्‍टेलमध्‍ये येत होते युवक..
मुलांच्या हातावर हुक मारुन सुटल्‍या मुली..
सतना येथील मुलींच्‍या वसतिगृहात शुक्रवारी दोन मुली पळून गेल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर या घटनेचा खुलासा झाला. या मुलींनी दमोह येथे पोहोचल्‍यानंतर एसडीएम कोर्टात हे धक्‍कादायक प्रकरण मांडले. वार्डनने त्‍यांना विकण्‍याची तयारी केली होती, असा आरोप या मुलींनी केला आहे. दमोह पोलिसांनी वार्डनला दमोहला बोलावले आहे.
नातेवाईकांना दिली माहिती..
18-19 वर्षीय मुली अंजू-मंजू(काल्पनिक नाव) या शुक्रवारी सायंकाळी महिला वसतिगृहातून पळाल्‍या होत्‍या. तेथून त्‍या जबलपूरला पोहोचल्‍या. अंजू ही दमोह जिल्‍ह्यातील हरपालपूरा (पटेरा) येथील राहणारी आहे. तर, मंजू ही यूपीच्‍या चित्रकूट येथील आहे. अंजूने जबलपूरला पोहोचल्‍यानंतर नातेवाईकांना ही घटना सांगितली. त्‍यानंतर येथील एसडीएम कोर्टात या दोघींनी या प्रकाराची माहिती दिली.
मंजूचा 50 हजारात, अंजूचा 1.75 लाखात झाला होता सौदा..
अंजू-मंजू यांनी सांगितले की, घटना घडली तेव्‍हा हॉस्‍टेलमध्‍ये त्‍या दोघीच होत्‍या. वॉर्डन स्नेहलता श्रीवास्तव अाणि अर्चना श्रीवास्तव दिवसा हॉस्‍टेलला कुलूप लावत होत्‍या. तर, रात्री दरवाजे बंद करु देत नव्‍हती. हॉस्टेलमध्‍ये मुले येत होती. रात्री दरवाजा उघडाच असेल, जे मनात वाटेल ते करा, असे वार्डन मुलांना सांगत असल्‍याची माहिती युवतींनी दिली.
बाथरुममध्‍ये लपून बसल्‍या..
अंजूने सांगितले, आम्‍ही दोघीही दोन तास बाथरुममध्‍ये लपून बसलो. या घटनेनंतर आम्‍ही प्रचंड घाबरलेल्‍या अवस्‍थेत होतो. त्‍यानंतर वार्डन आमचा सौदा करत असल्‍याचे आम्‍हाला समजले. आम्‍हाला विकण्‍याची तयारीही चालू होती. हॉस्टेलमध्‍ये काम करणा-या सफाई कामगार महिलेलाही समजले होते की, आपल्‍यासोबत काहीतरी गडबड होत आहे. त्‍यामुळे तिने मुख्‍य गेटचे कुलूप लावले नव्‍हते. संधी साधून आम्‍ही दोघींनी पळ काढला.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...