आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चेस हार्दिक पटेलला सरकारचे आमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- पाटीदार आरक्षण आंदोलन समिती (पीएएएस)चा प्रमुख हार्दिक पटेल यास पाटीदार समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी गुजरात सरकारने खुले निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हे निमंत्रण पाठवले आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ही माहिती दिली. हार्दिक पटेल चर्चेसाठी आमचे निमंत्रण स्वीकारेल अशी अपेक्षा आहे. अचानक असे निमंत्रण देण्याच्या कारणाचा खुलासा करताना उपमुख्यमंत्री पटेल यांनी सांगितले, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याची चर्चा झाली. विविध समाजांत जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर विचारविनिमय करण्यासाठी तरुणांच्या आणि समाजाच्या हितासाठी गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित राहावी म्हणून खुल्या मनाने सरकारने हे पाऊल उचलले आहे.
शिष्टमंडळ पाठवू : उपमुख्यमंत्री
हार्दिक पटेल याने सरकारचे निमंत्रण स्वीकारले, तर बैठकीत पुढील दिशा ठरवण्यासाठी विचारविनिमय करण्यात येईल. सरकार वाटाघाटीसाठी उदयपूरला शिष्टमंडळ पाठवू शकते. तर जवळचे प्रतिनिधी मंडळ गांधीनगर येथेही भेटू शकते. राजद्रोहाचा आरोप असलेला हार्दिक पटेल सध्या जामिनावर आहे. जामिनाच्या अटीनुसार गुजरातच्या बाहेर तो उदयपूरला राहत आहे.
बातम्या आणखी आहेत...