आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेशिवायही चालणार वॉशिंग मशीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - वॉशिंग मशीन हे गृहिणींसाठी आवश्यक उपकरणांच्या यादीतील एक आवश्यक उपकरण बनले आहे. फोनो रोबोट हा फोनद्वारे जगातून कुठूनही संचालित होणारा यंत्रमानव, पॅडलने चालणारे वॉशिंग मशीन, डाटा सेव्ह करण्यासाठी चार लेअरची पासवर्ड सिस्टिम, लहानपणी कागदावर खेळलेल्या क्रॉस-झीरोचे गेमिंग आता लॅपटॉपमध्ये आलेले आणि अपंगांना वस्तू विकणारी विशेष सायकल, अशा अनेक कल्पनांचा मेळा पेक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या ओपन हाऊस-2013 मध्ये जमला होता. या सर्व कल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या. बहुतांश विद्यार्थ्यांनी मिलिटरी सर्व्हिलन्स आणि मोठय़ा कंपन्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित केले आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अपंगांसाठी सायकलचे डिझाइन बनवले आहे. ही सायकल एक हात व पाय नसलेल्या व्यक्तीला रोजगार देण्यासाठी बनवली आहे.

4500 रुपयांत पॅडलचे वॉशिंग मशीन
बीटेक मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी हे इनोव्हेशन होस्टेलमध्ये वापरायला सुरुवातही केली आहे. मशीनमध्ये इम्पेलर्स लावले आहेत. पाणी व डिटर्जंट टाकून 10-15 मिनिटे चालवल्यास सुमारे 5 किलो (10-15) कपडे धुतले जातात. 4500 रुपयांचे हे मशीन वाहतूक खर्चासह 7 हजारांत मिळते.