आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्रीतून अटले या तलावाचे पाणी, गावकरी झाले भयभीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही तलावांचा एरियल व्ह्यू. लाल रंगात आटलेला तलाव. - Divya Marathi
दोन्ही तलावांचा एरियल व्ह्यू. लाल रंगात आटलेला तलाव.
रायपूर - छत्तीसगडमधील रायपूरपासून 85 किलोमीटर अंतरावरील माणिकपूर गावात शनिवारी रात्री जवळपास तीन एकर परिसरातील तलावाचे पाणी अचानक गायब झाले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला खेटूनच असलेल्या दुसऱ्या तलावात अजूनही पाणी आहे. या घटनेने गावकरी घाबरले आहेत. दुसऱ्या तलावातील पाणीही अटणार नाही ना, याची भीती त्यांना सतावत आहे.

कसा अटला तलाव
तीन एकरात पसरलेला तलाव 8 फूट खोल होता. भूशास्त्रज्ञांच्या मते जमीनीखाली चूनखडी आहे. ती पाण्यात मिसळून जाते. पाणी त्यातून मार्ग काढत जमीनीच्या पोटात सामावले.

स्फोटांनीही असे होण्याची शक्यता
माणिकपूर गावाला लागून मोठा खाण उद्योग आहे. तिथे नेहमी स्फोट होत असतात. शक्यता आहे, की या स्फोटांमुळे जमीनीच्या पोटात भेगा पडल्या असतील आणि तलावातील पाणी तिथे सामावले असेल.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्...