आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रांगेत उभा राहून पाणी भरतो द ग्रेट खली, वीज, पाणी प्रश्नावरून केले आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - गावात रांगेत उभा राहून पाणी भरणारा खली.
शिमला - वीज, पाण्याच्या समस्येला सामान्य नागरिकांबरोबरच मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींनाही सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. अनेक दिवसांनंतर परदेशातून आपल्या गावी पोहोचलेला आणि जगभरात देशाने नाव गाजवणारा पहिलवान दलीप राणा उर्फ द ग्रेट खली हाही सध्या या समस्यांनी त्रस्त आहे. अखेर या समस्यांसाठी त्याने रस्त्यावर आंदोलन केले. अंडरटेकर आणि बिग शो सारख्या मोछ्या पहिलवानांना रिंगमध्ये चित करणार्‍या या महारथीला आता हक्कासाठी लढावे लागत आहे.
हिमाचलच्या नैनीधार घाटीमध्ये नुकतेच खलीने वीज आणि पाण्याच्या समस्यांनी त्रस्त झाल्याने रस्त्यावर आंदोलन केले. वीज आणि पाण्यासारख्या मुभूत गरजा पूर्ण होत नसतील तर लोकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही खलीने दिला आहे.
समस्या कोणत्या?
खलीचे गाव धिराइनाबरोबरच परिसरातील पाच पंचायतींमधील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या संकटाने नागरिक त्रस्त आहेत. जेव्हाही परदेशातून घरी परततो तेव्हा वीज आणि पाण्याची समस्या भेडसावते असे खलीचे म्हणणे आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तो गावी आला होता त्यावेळी वीज आणि पाण्याची भीषण टंचाई होती असेही खली म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर काही PHOTO