आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याविना मरणाच्या दाढेत जाणाऱ्या हरणांसाठी वाळवंटात 66 जलसाठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर (राजस्थान)- दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याविना ५० पेक्षा जास्त हरीण दगावत होते. त्यामुळे वाळवंटात पॉलिथिनच्या साहाय्याने पाणीसाठे तयार केले. आतापर्यंत ६६ साठे तयार झाले आहेत. श्रीगंगानगरच्या लखासर गावातील अनिल धारणिया यांनी यासाठी पुढाकार घेतला. ते म्हणाले, गेल्या वर्षी उन्हाळ्यात एका गावाला जाताना रस्त्यात ठिकठिकाणी हरणांचे मृतदेह दिसले. पाण्याअभावी त्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. परिसरात १० हजार हरीण आहेत. हरीण  पाण्यासाठी ते गावात आल्यावर कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवत. त्याचक्षणी त्यांचा जीव वाचवण्याचे ठरवले.

देखभालीचा २ लाख रुपये खर्च ग्रामस्थांनी उचलला
अनिल म्हणाले, पाणीसाठ्याची कल्पना पाणपोईतून आली. उन्हाळ्यात पाणीसाठे तयार केले जातात. या वर्षी २०० ग्रामस्थांनी ४० साठे बनवले. यामध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी भरले जाते. ज्या गावाजवळ हा साठा असेल तेथील लोकांनाच तो भरावा लागतो. त्याच्या देखभालीवर व बांधणीवर २ लाख रुपये खर्च येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...