आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव ‘पाणीकोटडा’ अन् गावात घोटभरही पाणी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराडी (राजस्थान)- उदयपूर जिल्ह्यातील पाणीकोटडा गावात सध्या नावात आहे तेवढेच पाणी आहे. 400 लोकसंख्येच्या या गावात दोन हातपंप आहेत, पण ते कोरडे पडलेत. गावातील विहिरीचे पाणी खारे असल्याने ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे गावातील महिलांना दोन किलोमीटर अंतरावरील जयसमंद तलावावरून पाणी आणावे लागते. या छायाचित्रात सर्वात पुढे चालत असलेल्या नवलीबाई 55 वर्षांच्या आहेत तर सर्वात छोटी मनीषा आहे 8 वर्षांची. गरजेनुसार या महिलांना डोक्यावर दोन दोन हंडे घेऊन तीन चार फेर्‍याही कराव्या लागतात. विशेष म्हणजे या सर्व महिला सोबतच पाणी भरतात. स्नानासाठी सर्व गावकरी या तलावावर येतात तर जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी येथेच आणले जाते. जून महिन्यापर्यंत या तलावापासून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न असल्याचे पाणीकोटडा गावाच्या सरपंचांनी सांगितले.