आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! टरबूजमध्ये इंजेक्ट केले जातेय केमिकल; होऊ शकतो कॅन्सर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: टरबूजमध्ये अल्ता आणि साखरेचे मिश्रण असे इंजेक्ट केले जाते. )
धनबाद- सध्या उन्हाळा सुरु झाला असून कडाक्याचे ऊन तापत आहे. उन्हाळ्यात टरबूजाला जास्त मागणी असते. ताण, थकवा दूर करण्यासाठी टरबूज लाभदायक असते. परंतु, सध्या बाजारात आलेले टरबूज आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित नाही. व्यापारी टरबूजमध्ये अल्ता आणि साखरेच्या मिश्रणाचे इंजक्शन देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
केमिकलयुक्त तरबूज खाल्याने कॅन्सरसह अन्य जीवघेणे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. अन्य राज्यातून येणारे टरबूज व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. टरबूज नेहमी ताजे-तवाणे दिसावे म्हणून विक्रेते त्यात सिरिंजद्वारे केमिकल, रंग आणि साखर अथवा सेक्रीनचे मिश्रण सोडतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, केमिकलयुक्त टरबूज खाल्याने होऊ शकतो यूरीन ब्लॅडरचा कॅन्सर...