आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात आप्तेष्टांना जळताना पाहिले, आता अाग पाहून अन् भांड्यांच्या आवाजानेही थरकाप उडतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलम - केरळच्या कोलम येथील पुट्टिंगल मंदिरातील आतषबाजीच्या दुर्घटनेत १२३ जणांचे आयुष्य हिरावून घेतले. मात्र, त्या रात्रीच्या भयावह प्रसंगाने ४१ कुटुंबांतील नागरिकांची वेड्यागत अवस्था केली आहे. मानसिक धक्का, नैराश्याने एवढे घेरले की, घरात चुलीची आग पाहिली आणि भांड्यांचा आवाज ऐकला तरी अंगाचा थरकाप उडतो. आसपास गलका ऐकू आला किंवा वाहनांचा प्रकाशझोत पडला तरी या नागरिकांच्या अस्वस्थेत भर पडते.

या नागरिकांची अवस्था एवढी गंभीर झाली आहे की प्रशासनाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांच्या एका पथकाला पाचारण करावे लागले. उपचारासाठी छावणीत आलेल्या अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संध्या म्हणाल्या, दुर्घटनेत जखमी किंवा याचा फटका बसलेल्या सहा हजारांहून जास्त लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. ज्यांची या अग्नितांडवातून सुटका झाली किंवा ज्यांनी रुग्णांना दवाखान्यात पोहोचवले ते भाजलेल्या शरीरात प्राण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील बहुतांश जणांना नैराश्याने घेरले आहे. अशा रुग्णांना त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आणत आहेत. वैद्यकीय पथक आजाराचे निदान करून त्यांच्यावर उपचार करत आहे.

कोलम जिल्हा मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. रमेश चंद्रन यांनी अशा अवस्थेतील ४१ कुटुंबांना उपचार देणे सुरू केले आहे. त्यांचे सतत समुपदेशन केले जात आहे. डॉ. चंद्रन म्हणाले, ज्यांना गंभीर धक्का बसला आहे त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्यास त्यांना मानसिक विकार जडू शकतो. ज्यांच्या मनोस्थितीत दुर्घटनेचे दृश्य चिकटले आहे, असे शेकडो लोक आहेत. अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना याचा विसर पडणे कठीण ठरत आहे. पंधरा दिवसांपेक्षा जास्त वेळेस हे दृश्य वारंवार त्यांच्या डोळ्यांसमोर आल्यास हे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या टीममधील समुपदेशक डॉ. महेशकुमार म्हणाले, त्यांचे पथक घरोघरी जाऊन तणावग्रस्त व अस्वस्थ नागरिकांना धीर देत आहे. डॉ. महेश म्हणाले, घटनेच्या सहा दिवसांनंतरही अनेक लोक एवढे तणावात आहेत की घरात चुलीचा जाळ पाहून ओरडत बाहेर पळतात. अशा किंवा अशा पद्धतीच्या घटना कळाल्यानंतर पथक त्वरित त्या घरी पोहोचते आणि समुपदेशन करते. डॉ. संध्या म्हणाल्या, एका मुलीला एवढा धक्का बसला आहे की तिने अन्नपाणी सोडले आहे. तिला त्रिवंेद्रमला हलवण्यात आले आहे. डॉ. रमेश म्हणाले, घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी दोन-तीन दिवस झोपू शकले नाहीत. त्यांना झोपेसाठी औषध दिले जात आहे.

अद्यापही सर्वत्र दारूचा वास : घटनास्थळाजवळ अद्यापही फटाक्यांच्या दारूचा वास आहे. यावरून इथे किती प्रमाणात फटाके फोडण्यात आले याचा अंदाज येतो. ढिगारा चहुबाजूने विखुरला आहे. लोकांची शरीरे छिन्नविछिन्न झालेल्या ठिकाणाची नाकेबंदी केली आहे.

डॉक्टर म्हणाले - त्यांना रडू द्या...
भाऊ गमावणारे अरविंद छावणीत आले अाहेत. त्यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांना रडू आले. शांत करण्याचा प्रयत्न केल्यावर डॉक्टर म्हणाले, त्यांना रडू द्या. पाच मिनिटानंतर अरविंद म्हणाले, माझा भाऊ मोबाइलवर व्हिडिओ बनवत असताना स्फोट झाला. यानंतर तो दिसला नाही. केवळ मांसाचे तुकडे दिसले. अरविंदच्या पायाला प्लास्टर पाहून विचारले, तुम्हालाही जखम झाली होती का? त्यावर ते म्हणाले, माहीत नाही.
बातम्या आणखी आहेत...