आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wearing Jeans Pant Against Indian Culture Singer Yesudas, Divya Marathi

मुलींचे जीन्स पँट घालणे भारतीय संस्कृतीविरुद्ध - प्रसिध्‍द गायक येसुदास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवअनंतपुरम - मुलींचे जीन्स पँट घालणे हे भारतीय संस्कृतीविरुद्ध असल्याचे प्रसिद्ध गायक येसुदास यांनी म्हटले आहे.गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमात येसुदास (७४) संबोधित करत होते. ते म्हणाले, महिलांनी जीन्स घालून इतरांसाठी अडचण निर्माण करू नये.
जे झाकायला हवे ते झाकलेच पाहिजे. या प्रकारचे पोशाख भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहेत. आपल्या संस्कृतीत साधेपणा व ऋजुता हे महिलांचे महत्त्वाचे अंगभूत पैलू असल्याचे सांगितले गेले आहे.

दरम्यान, येसुदास यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत महिला काँग्रेसने विरोध मोर्चाही काढला.