आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weather Department Save From Devestation Of Hudhud

हवामान खात्याने वाचवले हुदहुदच्या विध्वंसापासून, आज पंतप्रधान विशाखापट्टणममध्‍ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - हुदहुद हे चक्रीवादळ आता थंडावले आहे. मात्र, सोमवारपर्यंत आंध्र प्रदेश व ओडिशात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या विशाखापट्टणममध्ये १५ ठार झाले.
चोहोकडे विध्वंस झाला आहे. तरीही हवामान खात्याचा अचूक इशारा व प्रशासनाच्या सज्जतेमुळे हजारोंचा जीव वाचला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणमला जात आहेत.

नासापेक्षाही अचूक ठरला भारतीय हवामान खात्याचा अंदाज
नासाचा अंदाज असा...
* १० ऑक्टोबरला सांिगतले रविवारी आंध्रच्या किना-यावर हुदहुद आदळणार. मात्र, अचूक स्थान माहीत नाही.
* चक्रीवादळाचा वेग ताशी १८५ किलोमीटरच्या जवळपास असेल.
* त्याची व्याप्ती फायलिनसारखीच असेल, तितकाच विध्वंसही घडवेल.
मात्र हवामान खात्याने...
* ६ ऑक्टोबरलाच सांगितले होते की, रविवारी वादळ आंध्रच्या किना-याला भिडेल. मग दहा ऑक्टोबरला सांगितले, दुपारपर्यंत विशाखापट्टणम पोहोचेल हुदहुद.
* वा-याचा वेग ताशी १९५ किमी असेल. वादळाआधी व गेल्यानंतर मुसळधार पाऊस पडेल.
* व्याप्ती व तीव्रता फायलिनसारखी नसेल. केवळ सहा तासांतच वादळ ओसरण्यास सुरुवात होईल.

... अन् तेच घडलेही
* रविवारी दुपारी १२ वाजता वादळ विशाखापट्टणमला धडकले.
*वा-याचा वेग ताशी १९५ ते २०० किमी राहिला. रात्रीपर्यंत वा-याचा वेग ताशी ९० किमी झाला.
*जीवित आणि वित्तहानीही फायलिनपेक्षा कमीच झाली.

अशी बदलत गेली रणनीती
1999 : १५ वर्षांपूर्वी १५ हजार मृत्यू- ओडिशा राज्याला सुपर सायक्लोनचा तडाखा. वेग, आकार व वेळेची अचूक माहिती नसल्याने १५ हजार लोकांचा मृत्यू झाला.
2013 : भारताने मोठा धडा घेतला- १२ ऑक्टोबरला फायलिन ओडिशात पोहोचले. भारताने नासावर विश्वास केला नाही. हवामान खात्याच्या माहितीवर तयार करण्यात आली. ५० पेक्षा कमी लोकांचा मृत्यू.
संयुक्त राष्ट्रानेही हवामान खाते व सरकारच्या सज्जतेची प्रशंसा केली होती. १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.