आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: आपल्याच लग्नात अशी नाचली नवरी, नवरदेवाची अशी होती रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - आपल्या लग्नाला यादगार करण्यासाठी लोक मोठे हॉटेल, गार्डन निवडतात, परंतु रविवारी एक अनोखे लग्न झाले, हे यादगार असण्यासोबतच प्रेरणादायीही ठरले. फाइन आर्ट कॉलेजमधील गुंजन लढ्ढा आणि नितीन योगी यांनी आपले लग्न आस्था वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने केले. या वेळी ज्येष्ठांनीही कुटुंबाप्रमाणेच या लग्नात सामील होऊन आनंद द्विगुणित केला. शहनाईच्या धुनीवर नवरदेव-नवरी मनसोक्त नाचले. नवरीची स्वत:च्या मुलीप्रमाणे विदाई करताना वृद्धाश्रमातील सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ज्येष्ठ नागरिक म्हणाले- तब्बल 15 वर्षांनंतर एखादे लग्न पाहणे आमच्या नशिबी आले आहे.

 

ज्येष्ठांच्या आनंदासाठी
गुंजन म्हणाली, पप्पांनी मला विचारले की तू स्वत:साठी खूप काही केले, पण इतरांच्या आनंदासाठी काही विचार केला आहेस का? गुंजनजवळ त्या वेळी त्यांच्या प्रश्नाला उत्तर नव्हते. परंतु वडिलांच्या या प्रश्नाने तिच्या मनात घर केले. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा आलिशान हॉटेल, रिसॉर्ट आणि गार्डन निवडण्याऐवजी वृद्धाश्रमाची तिने निवड केली.
- परदेशीपुरा येथील आस्था वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी रविवारचा दिवस खास होता. येथे फाइन आर्ट कॉलेजमध्ये कार्यरत गुंजन लढ्ढा आणि नितीन योगी यांनी ज्येष्ठांच्या आशीर्वादाने लग्न केले. गुंजनने आपल्या वडिलांजवळ ही इच्छा जाहीर केल्यावर त्यांना अपार आनंद झाला. 
- या वृद्धाश्रमात लग्ना वेळी माहेरचे आणि सासरचे अशा दोन्ही रुपांत ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या लग्नादरम्यान वृद्धांनीही मनसोक्त डान्स केला. 

- गुंजन म्हणाली, जेव्हा लग्न ठरले तेव्हा दोघांनीही ठरवले की, हे लग्न यादगार करण्यासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठीही आपण काहीतरी करूयात. यासाठी आम्ही लग्न वृद्धाश्रमात करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी दोन्ही कुटुंबांना तयार केले. गुंजन आणि नितीनच्या या प्रयत्नामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि तिच्या विदाईच्या वेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. आपुलकी, प्रेम, आत्मीयता या सर्वांपासून वंचित राहणारे हे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ या लग्नसोहळ्याने आनंदी झाल्याचे दिसले.
- लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे जेवणाचा मेनू ज्येष्ठ नागरिकांना लक्षात ठेवून बनवण्यात आला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या यादगार लग्नातील आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...