आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HDFC बँक चेयरमनच्या मुलाचे लग्न या राजवाड्यात, US हून येणार नवरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांचा मुलगा सिद्धार्थ याच्या लग्नाचा सोहळा येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये होणार आहे. यासाठी टाटा ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्त्री 29 नोव्हेबंरला जोधपूरला येणार आहेत. 27 ते 29 नोव्हेंबर पर्यंत लग्न सोहळा असणार आहे. याला अनेक दिग्गज उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. सध्या येथे लग्न समारंभाची तयारी सुरु आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पारेख कुटुंबियांतील काही सदस्य दोन दिवसांपासून जोधपूरमध्ये आले आहेत. त्यासाठी येथील सर्व तारांकित हॉटेल्स तीन दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.
स्मिता पारेख उद्या येणार
लग्नाची तयारी करण्यासाठी दीपक पारेख यांची पत्नी स्मिता या 25 नोव्हेंबरला जोधपूरमध्ये येतील. त्यांच्या कुटुंबातील इतर लोक 26 ला येणार आहेत. सिद्धार्थची होणारी पत्नी क्लेरी ओ नेल आणि तिचे कुटुंबिय अमेरिका आणि ब्रिटेनहुन जोधपूरला येतील.
चार्टर आणि नियमीत फ्लाइट्सने येणार 250 पाहुणे
जोधपुरमध्ये होणार्‍या या शाही विवाह सोहळ्यासाठी 250 पाहुणे येणार आहेत. 27 नोव्हेंबर रोजी जेट एअरवेजचे 180 सिटर चार्टर विमान मुंबईहून जोधपूरला येईल. लग्नानंतर हेच विमान पाहुण्यांना घेण्यासाठी परत येणार आहे. या शाही लग्नासाठी आनंद महिंद्रा, राहुल बजाज यांच्यासह उद्योग जगतातील अनेक दिग्गज येण्याची शक्यता आहे.
ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने होणार लग्न
सिद्धार्थ पारेख याचे लग्न अमेरिकेच्या क्लेरी ओ नेलसोबत होणार आहे. त्यासाठी तीन दिवस शहरातील हॉटेल्स बुक करण्यात आल्या आहेत. 27 नोव्हेंबरला मेहरानगड येथे संगीत होईल. 28 नोव्हेबंरला बालसमंद येथे ख्रिश्चन पद्धतीने आणि 29 नोव्हेंबरला उम्मेद भवन येथे हिंदू रिती-रीवाजानुसार लग्न होईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उम्मेद भवन पॅलेसचे PHOTOS...