आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासातच विधवा झाली नववधूू, रिसेप्‍शनमध्‍ये स्‍टेजवरच कोसळला होता नवरदेव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- लग्‍न झाले त्‍याच दिवशी विधवा होण्‍याची वेळ लुधियानातील एका मुलीच्‍या नशिबी आली आहे. लग्‍न समारंभानंतरच्‍या रिसेप्‍शनमध्‍ये पाहुणे वधुला सौभाग्‍यवती भव असा आशीर्वाद देत असतानाच तिच्‍या जोडीदाराचा मृत्‍यू झाला. अचानक घडलेल्‍या या घटनेमुळे मुलीला धक्‍का बसला असून शहरात हळहळ व्‍यक्‍त होत आहे.   
 
अचानक बेशुध्‍द झाला नवरा 
- लुधियानातील रोपड रोडवरील बेले गावात ही घटना घडली. 
- लग्‍नानंतर सासरच्‍या मंडळींनी रिसेप्‍शन ठेवले होते. 
- त्‍यातच नवरामुलगा गगनदीपचा मृत्‍यू झाल्‍यामुळे समारंभावर शोककळा पसरली. 
- रिसेप्‍शनमध्‍ये पाहुण्‍यांशी भेट-गाठ चालु असतानाच गगनदीप अचानक बेशुध्‍द झाला. 
- गगनदीपच्‍या कुटुंबियांनी त्‍याला तातडीने रुग्‍णालयात दाखल केले. 
- मात्र तोपर्यंत गगनदीपची प्राणज्‍योत मावलली होती.  
- डॉक्‍टरांनी गगनदीपला तपासून मृत घोषित केले. 
 
दोन्‍ही कुटुंबावर शोककळा 
- गगनदीपच्‍या मृत्‍यूमुळे त्‍याच्‍या व नवरी मुलीच्‍या कुटुंबीयांना धक्‍का बसला आहे. 
- 29 जानेवारी रोजी माछीवाडातील कुलविंदर कौरसोबत त्‍याचा विवाह झाला. 
- गगनदीप जिममध्‍ये व्‍यायाम करत असे. त्‍याला कोणतेही व्‍यसन नव्‍हते. 
- गगनदीपच्‍या मृत्‍यूमुळे कुलविंदर कौरवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)