आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: येथे एकाच स्त्रीचे असतात अनेक पती, वाचा कसे निभावले जाते नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - सध्या हिमाचलमधील संपूर्ण वातावरण बदलले आहे. पर्यटक येथे या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात. Divyamarathi.com ने सुरू केलेल्या या विशेष सदरामध्ये आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत किन्नोरच्या एका विशेष परंपरेबद्दल, ज्यामध्ये एका महिलेचे अनेक पती असतात. या प्रथेला घोटूल म्हटल्या जाते.

हिमाचल प्रदेशाची ही प्रथा थोडी निराळीच आहे. येथे प्रत्येक गाव, शहरात एक नवीन प्रथा पाहायला मिळते. असे म्हणतात की, महाभारताच्या काळात किन्नोर प्रदेशात पांडवांनी हिवाळ्यात एका गुहेत पत्नी द्रौपदी आणि त्यांची आई कुंतीसमवते अज्ञातवासाचे काही वर्ष व्यतित केले होते. आम्ही तुम्हाला ज्या प्रथेबद्दल सांगणार आहोत त्याचा संबंध पांडवांच्या अज्ञातवासाशी जोडला जातो. या प्रथेला घोटूल म्हणतात.
सर्व भावांचे लग्न एकाच तरूणीशी होते
आपल्या देशात विवाहाच्या अनेक चालीरिती, तसेच प्रथा-परंपरा आहे. हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यात आजही बहू पति विवाह केल्या जातो. येथे राहाणार्‍या कुटुंबात महिलांचे अनेक पति असतात. मात्र हे पती वेगवेगळ्या कुटुंबातील असतात, तर एका महिलेचे पति हे सर्व एकाच कुटुंबातील असतात. एकाच छताखाली राहाणार्‍या कुटुंबातील सर्व भाऊ एकाच तरूणीसोबत परंपरेनुसार लग्न करतात आणि विवाहीत जीवन जगतात. जर या महिलेच्या अनेक पतींपैकी एकाचाही मृत्यू होतो तर त्या महिलेला दुःख व्यक्त करू देत नाहीत.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, कशा प्रकारे या प्रथेचे पालन केल्या जाते...