आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलिंगकर यांच्यासोबतचे मतभेद दूर होतील - नितीन गडकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्यासोबतचे मतभेद लवकरच दूर होतील, अशी अपेक्षा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी संघाची पदे सोडली पाहिजेत, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

वेलिंगकर यांच्यासमवेत काही मतभेद नक्कीच आहेत. धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीत ते आहेत; परंतु त्यांच्याशी चर्चा करून ते सोडवले जातील, असा विश्वास गडकरी यांनी शुक्रवारी गोव्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरदेखील उपस्थित होते. राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्यांनी संघाची पदे सोडली पाहिजेत. ही संघाची परंपरा आहे. काही लोकांनी राजकारण प्रवेशाचे निश्चित केले आहे. दुसरीकडे ते संघाच्या प्रादेशिक शाखेचे नेतृत्वही करत आहेत. या दोन्ही गोष्टी करता येत नाहीत. मी त्यांचा आदर करतो, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. वेलिंगकर यांच्या नाराजीची चर्चा देशभर झाली.

‘म. गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न राहुल साकारणार’
महात्मा गांधी यांचे काँग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न होते. ते काम राहुल गांधी करत आहेत. गांधींची इच्छा राहुल साकार करतील, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे. काँग्रेसमुक्त भारत असावा, असे त्यांना वाटते. आता त्यासाठी राहुल गांधींसारखे अनेक काँग्रेसजन प्रयत्नशील आहेत. काँग्रेस नेते भांडण करून योगदान देत आहेत, असा टोलाही गडकरी यांनी लगावला आहे.
बातम्या आणखी आहेत...