आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळाचा तामिळनाडूला सर्वाधिक फटका, 10 ठार; कर्नाटक आणि गोव्यात आज धडकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- ताशी 120 किमी वाऱ्याचा वेगाने ‘वरदा’ चक्रीवादळ सोमवारी (12 डिसेंबर) दुपारी अडीच वाजता चेन्नई व उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवरील जिल्ह्यांत धडकले. 50 वर्षांतील हे चेन्नईतील सर्वात वेगवान चक्रीवादळ आहे. तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.

चक्रीवादळामुळे वेगवेगळ्या घटनांत 10 लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. दुर्गम भागातील माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तिरुवल्लूवर व कांचीपुरमला या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. पण चक्रीवादळाचा जोर बराचसा मंदावला आहे. आज (मंगळवारी) ते कर्नाटकात पोहोचेल आणि गोव्यात संपुष्टात येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी केली होती. मागील 10 दिवसांत अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याच्या जोरावर तामिळनाडू आणि आंंध्रात शेेकडो लोकांचेे जीव वाचवण्यात यश आल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे.

किनारपट्टीवरील लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. तरी देखील या चक्रीवादळामुळे कोट्यावधी लोकांना फटका बसला आहे.

केंद्राने तैनात केले 600 जवान, 11 शिप्स...
- चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, नेल्लोर, सुलुरपेटा, प्रकाशम, चित्तूरमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचे (एनडीआरएफ) एकूण 19 पथके तैनात करण्‍यात वाले आहे. प्रत्येक पथकात 38 जवान आहेत.
- टीव्ही-रेडिओच्या माध्यमातून चक्रीवादळाच्या स्थितीची अपडेट माहिती देण्यात येत होती. याशिवाय मोबाइलची बॅटरी कायम चार्ज ठेवण्याच्याही सुचना देण्यात आल्या होत्या.
- लष्कराचे 600 जवान, नेव्हीची 11 जहाजे, कोस्ट गार्डचे 4 पथके व 6 पेट्रोलिंग जहाज, 4 डोरनियर, 2 चेतक एअरक्राफ्ट तैनात करण्‍यात आले आहे.
- याशिवाय 100 पेक्षा जास्त डॉक्टर्स तैनात करण्‍यात आले आहे. जेवण, टेंट, कपडे, कांबळ आणि औषधी उपलब्ध करण्यात आले आहे.
- रेस्क्यू आणि एअरड्रॉपसाठी नौसेनाचे विमान राजाली आणि देगा सज्ज ठेवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...