आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bengal 20 Yr Old Tribal Girl Gang Raped By 13 Men On Khap Orders

पश्चिम बंगालमध्ये आदिवासी तरुणीवर 13 जणांचे कुकर्म; 'कितीवेळा अत्याचार तेही विसरले'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीरभूम,कोलकाता - बिरादरीबाहेरील एका तरुणावर प्रेम करण्याची शिक्षा म्हणून एका आदिवासी तरुणीवर पंचायतीच्या प्रमुखासह 13 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात घडली. या भयंकर घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सी. सुधाकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल एम.के.नारायणन् यांनी त्या नराधमांना फासावर चढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान,या प्रकरणी बोलपूरचे उपविभागीय दंडाधिकारी पिजुश घोष यांनी 13 जणांना दोन आठवड्यांची कोठडी सुनावली आहे.
बीरभूमपासून जिल्ह्यातील लाभपूर गावातील या आदिवासी तरुणीचे बिरादरीबाहेरील एका तरुणावर प्रेम होते. त्याबद्दल खाप पंचायतीने तिला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.तिने एवढे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितल्यावर गावच्या ‘मोरोल’ने (सरपंच) तरुणीवर कुकर्म करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गावातील सुमारे 13 जणांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.त्यावेळी कुटुंबीयांना दुसर्‍या घरात कोंडून ठेवण्यात आले होते. या भयंकर घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला सुरी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

पुढील स्लाइडमध्ये, कितीवेळा अत्याचार तेही विसरले