आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bengal And Asama Assembly Election First Phase

आसाममध्‍ये 70% आणि बंगाल 80% मतदान, वाचा राहुल यांनी काय म्‍हटले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/गुवाहाटी - पश्चिम बंगाल आणि आसामममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदान सोमवारी झाले. यात बंगालमध्‍ये 80 टक्‍के तर आसाममध्‍ये 70 टक्‍के मतदारांनी आपला हक्‍क बवाला. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर डावे पक्ष - काँग्रेस आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, आसाममध्ये सलग चौथ्या वेळा निवडणूक जिंकण्याचे आव्हान मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यासमोर आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. जवळपास दीड महिना चालणाऱ्या या निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. बंगालमधील 18 तर आसाममधील 65 मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होईल. बंगालमध्ये सहा टप्प्यांत तर आसाममध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे.
राहुल यांचे ट्विट..
- सोमवारी बंगालमध्‍ये 2 वाजेपर्यंत 45% तर, आसाममध्‍ये 35% मतदान झाले.
- बंगालमध्‍ये 18 आणि आसाममध्‍ये 65 जागांसाठी मतदान होत आहे.
- दरम्‍यान राहुल गांधी यांनी ट्विट करून सांगितले की, असाममध्‍ये दुस-या टप्‍प्यातील मतदानापूर्वी ते गोलपारा, डुबरीमध्‍ये प्रचारासाठी जाणार आहेत.

पश्चिम बंगालमधील नक्षलवादी भागात सोमवारी मतदान होईल. त्यात पश्चिम मिदनापूर, पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यांचा समावेश आहे. 18 मतदारसंघात 133उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने या 18 मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघांचे वर्गीकरण नक्षलप्रभावित असे केले आहे. तेथे सुरक्षा कारणास्तव दुपारी 4 वाजेपर्यंतच मतदान होईल. पुरुलिया, मनबाजार, काशीपूर, पारा आणि रघुनाथपूर येथे नेहमीप्रमाणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल.

2011 च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांची 34 वर्षांची राजवट उलथवून ममता बॅनर्जी सत्तेत आल्या होत्या. त्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसची युती होती. मात्र त्यानंतर काँग्रेसने ही युती तोडून आता डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे. तृणमूल आणि भाजप यांनी या आघाडीलाच लक्ष्य केले आहे.

आसाममध्ये गोगोईंना भाजप आघाडीचे अाव्हान
आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 65 मतदारसंघांत मतदान होईल. या टप्प्यात 539 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात सत्ताधारी काँग्रेसला भाजप-आगप-बीपीएफ युतीचे आव्हान आहे. काँग्रेस सर्व 65 जागा लढवत आहे, तर भाजप 54, आगप 11 आणि बीपीएफ 3 जागा लढवत आहे. एआययूडीएफ 27 जागा, माकप आणि भाकप प्रत्येकी 10 , मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष 6, अपक्ष 13 तर इतर पक्ष 60 जागा लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री तरुण गोगोई (तिताबोर), विधानसभा अध्यक्ष प्रणव गोगोई (शिवसागर) आणि माजी केंद्रीय मंत्री पवनसिंग घटोवार यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून 40 हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेसची करुणानिधींशी आज चर्चा...