आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसगुल्ल्याच्या उत्पत्तीवरून पश्चिम बंगाल व ओडिशात जुंपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - एरवी रसगुल्ला हा शब्द जरी उच्चारला तर जिभेवर मधुर रस पाझरू लागतो. मात्र, याच रसगुल्ल्याच्या उत्पत्तीवरून पश्चिम बंगाल व ओडिशात जुंपली आहे. प. बंगालच्या दाव्यावर ओडिशा सरकारने एक-दोन नव्हे, तीन समित्या स्थापल्या आहेत.
राज्याचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री प्रदीप पाणिग्रही म्हणाले, या समित्यांत एसएमई आणि मध्यम उद्योग व सांस्कृतिक खात्याचे सदस्य नेमले जातील. प. बंगालने रसगुल्ल्यावर आपली मालकी प्रस्थापित करण्यासाठी गेल्याच महिन्यात त्याच्या भौगोलिक संकेतांक प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. यावरून ओडिशात भलताच प्रक्षोभ उडाला. रसगुल्ल्यावर प. बंगालच्या दाव्याविरुद्ध गेल्या महिन्याच्या अखेरीस ओडिशाच्या विधानसभेत चांगलीच चर्चा झडली होती.
पहिली समिती : ओडिशात रसगुल्ल्याची उत्पत्ती कशी झाली, ते सिद्ध करण्यासाठी तथ्ये आणि पुराव्यांचा समिती अभ्यास करेल.
दुसरी समिती : पश्चिम बंगाल कोणती तथ्ये-पुराव्यांच्या जोरावर रसगुल्ल्यावर मालकीचा दावा करतोय, ते तपासण्यासाठी.
तिसरी समिती : रसगुल्ला ओडिशाच्याच मालकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे आणि पुरावे जमा करण्यासाठी.
प. बंगाल : कलकत्त्याचे हलवाई नवीनचंद्र दास यांनी रसगुल्ला ही मिठाई पहिल्यांदा तयार केली होती. भगवान श्रीकृष्णाने स्वप्नात दास यांना रसगुल्ल्याची रेसिपी सांगितली होती, अशी दंतकथादेखील आहे.

ओडिशा : तीर्थस्थळ जगन्नाथ पुरीमध्ये १३ व्या शतकात रसगुल्ला बनवला होत होता. भगवान जगन्नाथ यांना नैवेद्य म्हणून रसगुल्ला
चढवला जात असल्याचा दावा.