आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bengal Government Give Job And Shelter To Rape Victim

पश्चिम बंगाल सरकार सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेला देणार नोकरी आणि घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - आदिवासी मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेला रोजगार आणि गावाजवळ घर देण्याचे राज्य सरकारकडून शनिवारी जाहीर केले. गावात परतण्यास पीडितेला विरोध करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही मदत देऊ केली आहे.
पीडितेच्या गावाजवळ इंदिरा आवास योजनेच्या कोट्यातून तिला घर देण्याचे सरकारने ठरवले आहे, अशी माहिती पश्चिम बंगाल महिला आणि बालकल्याण मंत्री शशी पांजा यांनी दिली. पीडितेला पोलिस संरक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तिला नोकरी देण्याचाही आम्ही विचार केला; परंतु नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तिच्याकडे नाही. त्यामुळे मनरेगाअंतर्गत काम करण्यास तिने तयारी दर्शवली आहे.