आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालच्या 'कन्याश्री प्रकल्प' योजनेला UN कडून पुरस्कार, 62 देशांमधून झाली निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. - Divya Marathi
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कोलकाता / हेग - संयुक्त राष्ट्रकडून पश्चिम बंगाल सरकारचा लोकसेवेतील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी तब्बल 62 देशांच्या 552 योजनांच्या अर्जांचा विचार करण्यात आला. त्यातून पश्चिम बंगाल सरकारच्या 'कन्याश्री प्रकल्प' या योजनेची निवड करण्यात आली. येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला अशी माहिती भारतीय उच्चायुक्तांनी शनिवारी दिली. 
 
कशी आहे ही योजना?
- पश्चिम बंगाल सरकाकडून कन्याश्री प्रकल्प ही योजना खास मुलींच्या शिक्षणासाठी लागू करण्यात आली आहे. 
- या योजनेत आतापर्यंत 40 लाख मुलींना समाविष्ट करण्यात आले आहे.
- योजनेत लाभार्थ्यांना थेट बँकेत पैसे ट्रांसफर करून लाभ दिला जातो. यात आतापर्यंत 50 कोटी अमेरिकन डॉलर  अर्थात जवळपास 3,225 कोटी रुपये ट्रांसफर करण्यात आले आहेत. 
- ही योजना राज्यभरातील 16 हजार शाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू आहे.
 
बातम्या आणखी आहेत...