आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत 11 उमेदवार ग्लॅमर आणि क्रीडा जगतातील असल्यामुळे त्यात आणखी रंगत येणार आहे. नऊ जणांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून, तर दोघांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नऊ उमेदवारांमध्ये अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्या कन्या मुनमुन सेन यांचा समावेश आहे. सेन बंकुरा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. जत्रा चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने तेथील लोकांशी संपर्कात राहिल्या आहेत. बंकुराच्या लोकांनी मला स्वीकारले आहे. निवडणुकीसाठीचा गृहपाठ पूर्ण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
मुनमुन यांच्या कन्या बॉलीवूड अभिनेत्री रिया आणि रायमा सेन आईच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. टॉलीवूड सुपरस्टार देव पश्चिम मिदनापूरमधील घाटल मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यांनी पगलू, चॅलेंज आणि चंदेर पहार आदी हिट बंगाली चित्रपट दिले आहेत.
जुन्या पिढीतील अभिनेत्री संध्या रॉय मिदनापूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर दार्जिलिंग येथून निवडणूक लढणार आहे. क्रीडा क्षेत्रानंतर आपण राजकारणात येण्याचे ठरवले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या प्रेरणेतून राजकारणात प्रवेश केल्याचे भुतियाने सांगितले. सिक्किमचा रहिवासी असलो, तरी दार्जिलिंगसारख्या पर्वतीय क्षेत्राचे मी प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आमच्यात बंधुभावाचा समान धागा आहे. मी या भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असे भुतियाने सांगितले. गोरखा जनमुक्ती मोर्चाकडून (जीजेएम) पाठिंबा मिळण्याच्या शक्यतेबाबत भुतिया म्हणाला, या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणे हे त्यांचे आणि आमचे उद्दिष्ट सारखेच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.