आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार्जिलिंगमधील पर्यटन ठप्प; बेमुदत बंदला हिंसक वळण, पोलिस अधिकाऱ्याची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आग लावली आहे. - Divya Marathi
आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आग लावली आहे.
दार्जिलिंग- वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) पुकारलेल्या बेमुदत बंदला हिंसक वळण लागले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याची आंदोलन करणाऱ्यांनी कुकरीने हत्या केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यामागे मोठे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली आहे. 

पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक

- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यांच्या वाहनांना आग लावली.
- आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज व काही ठिकाणी अश्रुधुराचा वापर करावा लागला. 
- हिंसाचारादरम्यान इंडियन रिझर्व बटालियन (आयआरबी) चे असिस्टंट कमांडट टी. एम. तमांग गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी आपल्या दोन समर्थकांना मारले : जीजेएम

- जीजेएमचे प्रमुख बिमल गुरंग यांनी पोलिसांनी आपल्या दोन समर्थकांना पोलिसांनी मारल्याचा आरोप केला. आपल्या दोन समर्थकांचा मृत्यू झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिला. पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पर्यटन ठप्प

- या हिंसक आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन ठप्प झाले आहे. सर्व व्यवसायांना याचा फटका बसला असून दरवर्षी एक लाख पर्यटक येथे येतात.
बातम्या आणखी आहेत...