आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. बंगालचे जुने सचिवालय होते जणू भंगाराचे भांडार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- येथील रायटर्स बिल्डिंग देशातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या जुन्या वास्तूंपैकी एक आहे. जवळपास ४० एकरांतील तीनमजली इमारत झाकोळून गेली आहे. मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांचे कार्यालय रिकामे पडले आहे. स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेले फेरबदल काढून टाकले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाकूड, प्लायवूड, अलमाऱ्या, लोखंडी सामान बाहेर निघत आहे. इमारतीचा आतमधील भाग हळूहळू मूळ स्वरूपात येत आहे.


साधारण वर्षापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथील ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले. इमारतीचे रुपडे बदलण्यासाठी ५४ सरकारी विभागांना शहरातील अन्य भागात स्थलांतरित केले. ममता सध्याच्या कारकीर्दीत या इमारतीत परत येतील असे वाटत नाही.

ही वास्तू वारसास्थळामध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणत्या व कशा पद्धतीचे बदल केले जावेत याचा अहवाल अद्याप तयार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव इंदीवर पांडे म्हणाले, डिसेंबरपर्यंत प्रकल्प अहवाल येईल आणि नंतर दीड वर्षात काम पूर्ण होईल. १९४७ नंतर झालेले बदल काढण्याचे काम सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांनी साफसफाईचे काम हाती घेतले तेव्हा अनेक जुने नकाशे आणि छायाचित्रे सापडली.
यामध्ये २१ एप्रिल १८८१ रोजी कोण्या ब्रिटिश अभियंत्याच्या स्वाक्षरीच्या नकाशाचा समावेश आहे. यामध्ये इमारतीच्या सर्वात आकर्षक सेंट्रल सर्कलचे डिझाइन आहे. इमारतीवर कोणताही रंग देण्यात आला नव्हता हे जुन्या छायाचित्रांवरून कळते. बाहेरच्या बाजूने विटांची कलाकुसर नजरेत भरते. इंग्रजांच्या काळापासून विटाला लाल रंग दिला जातो, मात्र हे काम कधी झाले याची माहिती उपलब्ध नाही.