आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western UP\'s Paranoid Parents Turn To ‘monk’ To Free Daughters From Muslim Lovers’ Spell

LOVE JIHAD : मुस्लीम प्रियकराच्या तावडीतून मुलीला सोडवण्यासाठी पालक साधूचरणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
सहारणपूर - नुकत्याच हिंसाचारात होरपळून निघालेल्या सहारणपूर येथे धार्मिक तेढ आणि अंधश्रद्धेचा प्रत्यत येणारे एक नवे प्रकरण समोर आले आहे. मुस्लीम तरुण हिंदु तरुणींना काळ्या जादूच्या मदतीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. येथील साधू रिजाकदास हे अशा मुलींवर उपचार करून त्यांना यातून सोडवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराला LOVE JIHAD असे नाव दिले जात असून त्यातून सुटका करण्यासाठी रिजाकदास यांच्याकडे चांगलीच गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

सहारणपूर येथे कोर्ट रोड परिसरात वास्तव्यास असणा-या रिजाकदास यांच्याकडे शेजारच्या बागपत जिल्ह्यातूनही नागरिक अशा प्रकारची मदत मागण्यासाठी येत आहेत. नुकतेच एक दाम्पत्य याठिकाणी आपल्या मुलीवर उपचार करून घेण्यासाठी आले होते. आपल्यामुलीवर एका मुस्लीम मुलाने काळी जादी केल्याने ती केवळ त्याच्याशी विवाह करण्याचा हट्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्यावर उपचारासाठी तिला आणण्यात आले होते.

अशा प्रकारच्या अनेक कारणांमुळे येथे हिंदु मुस्लीमांमधील दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. पण रिजाकदास यांच्याबरोबर आणखी काही काळ घालवल्यानंतर या कँसरचे विषाणू किती आतपर्यंत पसरले आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. मुस्लीम प्रियकरापासून सुटका करण्यात या 61 वर्षीय हिंदु साधुंची स्पेशालिटी आहे. LOVE JIHAD साठी ही त्यांची उपचारपद्धती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लीम मुलांशी प्रेम करणा-या किंवा लग्न केलेल्या हिंदु मुलींना त्यांच्याकडे आणून त्यांची सुटका करून घेतली जाते. त्यासाठी पवित्र जलाचा वापर ते करतात.
आमच्या कुटुंबांचा विनाश करण्यासाठी हा मुस्लीमांचा कट आहे. ते आमच्या मुलींना अशा प्रकारे वश करतात की, त्या पाण्याला शिवायलाही तयार नसलतात. अशावेळी बळाचा वापर करावा लागतो. अन्यथा इतर वेळी या काळ्या जादूचा प्रभाव आम्ही मंत्रोच्चारानेच कमी करतो अशी माहिती रिजाकदास यांनी दिली. उत्तरप्रदेशातील वातावरण शांत होत असतानाच आता 'Love jihad' चे प्रकरण डोके वर काढत असल्याने नवे आव्हान समोर येण्याची शक्यता आहे.
सहारणपूर येथील भाजपनेही येथे गेल्या वर्षभरात सुमारे 250 'Love jihad' ची प्रकरणे आढळल्याचे म्हटले आहे. हा सुनियोजित कट असून हिंदु समाजातील महिला आणि त्यातही अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले जात असल्याचे भाजपचे सहारणपूर येथील खासदार राघव लखनपाल यांनी म्हटले आहे. अनेकदा मुस्लीम समाजातील अत्यंत गरीब घरातील मुले जेव्हा हिंदु मुलींबरोबर निकाह करतात त्यावेळी त्यांना बाहेर पळून गेल्यानंकर राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. समाजाच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य नाही. एवढेच नव्हे तर समाजातर्फेच अनेकदा असे विवाह लावून दिले जात असल्याचा दावाही राघव यांनी केला.
धार्मिक तेढ वाढल्याचा परिणाम
दोन्ही धर्मांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर धार्मिक तेढ वाढली आहे. त्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे यसंदर्भातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. सहारणपूरचे पोलिस अधिक्षक धरमवीर सिंह यांनीही हा प्रकार केवळ जातीय तेढ वाढण्याचा असल्याचे म्हटले आहे. मुले स्वमर्जीने एकमेकांच्या प्रेमात पडतात, पण या प्रकरणांना धार्मिक रंग दिला जातो, असे ते म्हणाले आहेत.