आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What A Waste Of Milk In Performing Religious Ritual

सार्थक दुग्धाभिषेक : मंदिरांत वाहून जाणार्‍या हजारो लिटर दुधाची बचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील अनेक राज्यांत श्रावण महिन्यामध्ये एक अनोखी मोहीम सुरू आहे. विविध शहरांतील मंदिरांत दुग्धाभिषेकाचे दूध गरीब व उपेक्षित मुलांना वाटले जात आहे. यामुळे दुधाची नासाडी टाळण्यासोबत गरजूंपर्यंत दूध पोहोचवण्यात यश मिळत आहे. गरिबांना दूध देऊन त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मिळत आहेत. आतापर्यंत हजारो लिटर दूध गरिबांना वाटप झाले आहे. केवळ शिवभक्तच नव्हे तर मंदिरांतील पुजारी, व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थांनी या मोहिमेत भरभरून सहभाग घेतला आहे.

अभिषेकाच्या दुधातून गरीब मुलांचे पोट भरत आहे
जोधपूरच्या अचलनाथ मंदिरातील अभिषेकाचे दूध गरीब मुले आणि पशू-पक्ष्यांना दिले जात आहे. या पुढाकारामुळे वैजनाथ मंदिर आणि अन्य शिव मंदिरांतील व्यवस्थापनही पुढे आले आहे.
उदयपूरच्या मंदिरांचे ट्रस्टी आणि पुजार्‍यांनी भक्तांकडून प्रतीकात्मक दुग्धाभिषेक करून घेतल्यानंतर राहिलेले दूध गरिबांना देण्याची मोहीम हाती घेतली. यामुळे शहरातील प्रमुख 50 मंदिरांना दररोज दुग्धाभिषेकासाठी लागणारे जवळपास एक हजार लिटर दूध गरजू मुलांच्या पोटात जात आहे.

गरीब मुलांना देण्यासाठी भाविकांनी दुधाची वेगळी पिशवी आणावी : मंदिराचे आवाहन
चांदनी चौकातील गौरी-शंकर मंदिर समितीने भाविकांना गरीब मुलांसाठी दूध दान करण्याचे आवाहन केले आहे. अनेक भाविकांनी या आवाहनाला प्रतिसादही दिला. मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश शर्मा यांनी ‘दैनिक भास्कर’ने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून यामुळे गरीब व उपेक्षित बालकांना याचा लाभ मिळेल, असे सांगितले. हे पूण्यकर्म तर आहेच, शिवाय मानवतेची खरी सेवा ठरेल, असेही ते म्हणाले.

भाविकांचा पुढाकार, लोकांकडून श्रद्धेने दूध वाटप
छत्तीसगडमध्ये रायपूरसह अनेक शहरांमध्ये लोकांनी दूध वाटपाची मोहीम सुरू केली आहे. येथील मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घेतला नाही, मात्र लोकांनी या सत्कार्याचा विडा उचलला. रायपूरची सामाजिक संघटना अंकुशने टिकरापारा येथील शिव मंदिरमध्ये 15 लिटर दुधाचा अभिषेक केला. महासमुंदच्या श्रीराम जानकी मंदिर ट्रस्ट समितीने मंगळवारी 43 पॅकेट दूध कस्तुरबा ट्रस्ट आश्रमच्या आदिवासी मुलींना दिले. आश्रममध्ये 62 आदिवासी मुली शिकत आहेत.