बंगळुरु - भाजपा नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री राहिलेले के.एस. ईश्वरप्पा यांनी एका महिला रिपोर्टर संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. शनिवारी एका महिला रिपोर्टरच्या प्रश्नाला उत्तर देताना ईश्वरप्पा म्हणाले, ''तुम्ही येथे आहात, तुम्हाला जर कोणी जबरदस्ती आढून नेले, तुमचा रेप केला, तर आम्ही (विरोधी पक्ष)काय करू शकतो?'' दरम्यान मीडियाच्या एका शिष्टमंडळाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्याजवळ ईश्वरप्पांच्या विधानाबाबत तक्रार केली आहे.
ईश्वरप्पा यांनी हे विधान एका पोलिस अधिका-याच्या अंत्ययात्रेच्या वेळी केले होते. एका इंस्पेक्टरवर शुक्रवारी रात्री काही डाकुंनी चाकुहल्ला करून त्यांची हत्या केली. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ईश्वरप्पा यांच्यासह इतर पक्षाचे पुढारी उपस्थित होते. यावेळी एका महिला रिपोर्टरने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वादग्रस्त उत्तर दिले.
रिपोर्टरने काय विचारले?
कॉंग्रेसच्या राज्यात पोलिसांना सुरक्षा न दिल्यासंदर्भात ईश्वरप्पा मीडियाशी बोलत होते. दरम्यान लोकल कन्नड टीव्हीच्या महिला रिपोर्टरने विरोधी पार्टी तेव्हा का सुस्त होती अशा आशयाचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त उत्तर दिले. त्याचे विधान चांगलेच वादात सापडले. नंतर ते म्हणाले की, ''कर्नाटकच्या महिलांना मी बहिणींच्या रूपात पाहतो. आम्हाला राज्य सरकारला विचारायचे आहे की, ते काय करत आहेत. महिला सुरक्षेसाठी विरोधी पक्ष प्रत्येक काम करेल. मात्र विधानाचा गैरअर्थ काढण्यात येत आहे.'' असा खुलासाही त्यांनी केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, वादग्रस्त विधानावर कोण काय म्हणाले?