आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामचे दुखणे नेमके काय आहे?, वैद्य नीताने सांगितली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - आसारामबापूने ज्या वैद्य नीताला कारागृहात पाठवण्याची विनंती केली ती आसारामला अटक केली त्या दिवसापासून जोधपूरमध्येच आहे. गेल्या 18 दिवसांपासून तिचा हॉटेल ताजहरीमध्ये मुक्काम आहे. प्रत्येक सुनावणीच्या वेळी ती न्यायालयात हजेरी लावत आहे. ‘दिव्य मराठी’ने या प्रकारामागचे राज काय आहे, शेवटी आसारामचे दुखणे काय आहे, हे जाणून घेतले. खुद्द नीताची भेट घेऊन तिच्याशी झालेला हा संवाद..

प्रश्न : आसारामला काय आजार आहे?

उत्तर : बापूला ट्रायजेमिनल न्युरेल्जिया नामक अँलोपॅथिक आजार आहे. याला बापू त्रिनाडी शूल म्हणतात.

प्रश्न : आयुर्वेदात तर त्रिनाडी शूल अशा नावाचा कोणताही आजार नाही?

उत्तर : या आजाराचे आयुर्वेदिक नाव अनंतवात असे आहे. त्याला बोलीभाषेत त्रिनाडी शूल, असे म्हणतात. बापू तर काही वैद्य नाहीत की ते आयुर्वेदानुसार या आजाराचे योग्य नाव सांगू शकतील.

प्रश्न : आपण या आजारावर उपचार करता का?

उत्तर : गुजरातमधील राजवैद्य धनशंकर गौरी शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत आहे.

प्रश्न : आसाराम रोज तुम्हाला दोन तास कारागृहात कशासाठी बोलवण्याचा आग्रह धरत आहे?

उत्तर : वेदना जास्त झाल्या की, शिरोधारा उपचार आठ दिवस केला जातो. या उपचारासाठी दीड तासाचा अवधी लागतो. तयारी व येण्याजाण्याचा वेळ धरून दोन तास लागतात.

प्रश्न : वैद्यकीय यंत्रणा तर आसारामला कोणताही आजार नाही, असे म्हणते?

उत्तर : एमआरआयमध्ये या आजाराचे निदान होत नाही.

प्रश्न : पंचेड बुटी काय आहे, त्यामध्ये अफू असतो का?

उत्तर : आयुर्वेदात पंचेड बुटी नामक कोणतीही औषधी नाही. आमच्या आश्रमात पंचेड कोणीही बनवत नाही.