आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासभर बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरळीत सुरू झाले व्हॉट्सअॅप, कोट्यवधी यूझर्सचा खोळंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासह जगातील अनेक देशांत शुक्रवारी WhatsApp क्रॅश झाले. - Divya Marathi
भारतासह जगातील अनेक देशांत शुक्रवारी WhatsApp क्रॅश झाले.
नवी दिल्ली - मॅसेजिंग अॅप WhatsApp शुक्रवारी दुपारी अचानक तासभरापेक्षा जास्त वेळासाठी क्रॅश झाले. भारतासह अनेक देशांत याचा परिणाम पाहायला मिळाला. जगभरात कोट्वधी यूझर्सचा WhatsApp क्रॅश झाल्याने खोळंबा झाला. व्हॉट्सअॅपने नुकतेच सेंड मॅसेज डिलीट करण्यासाठी नवीन फिचर लाँच केले आहे. 

# 1:35PM वाजता झाले बंद 
- जगातील अनेक देशांतून WhatsApp क्रॅश झाल्याच्या बातम्या आल्या. ANI वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भारताच्या अनेक भागांत WhatsApp क्रॅश झाल्याच्या बातम्या आल्या. याठिकाणी दुपारी 1:35 नंतर मॅसेजिंग अॅप काम करत नव्हते. सुरुवातीच्या बातम्यांमध्ये यामागे सर्व्हर डाऊनचे असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका, ब्रिटन, इटली, सौदी अरब, फिलिपाइन्स, जर्मनी अशा देशांत तासभर व्हॉट्सअॅप बंद होते. नंतर ते सुरळीत सुरू झाले. 
- डाऊनडिटेक्टर वेबसाइटनुसार भारत, इंडोनेशिया, रशिया आणि मध्य एशियासह जगभरातील अनेक भागांत यूझर्सने व्हॉट्सअॅप डाऊन असल्याची तक्रार केली. युरोपवर सर्वाधिक परिणाम झाला. यूझर्सने याबाबत ट्वीटवर चर्चा सुरू केल्याने #whatsappdown ट्रेंड करत होते. 

# 100 कोटींपेक्षा जास्त यूझर्स 
जगभरात रोज सुमारे एक अब्ज (100 कोटी) हून अधिक यूझर्स व्हॉट्सअॅप वापरतात. तर महिन्याला सुमारे 1.3 अब्ज यूझर अॅक्टीव्ह असतात. रोज 55 अब्ज मॅसेज केले जातात. 4.5 बिलियन फोटो रोज शेयर होतात. 1 अब्जपेक्षा अधिक फोटो रोज व्हॉट्सअॅपवर सेंड केले जातात.
 
 
बातम्या आणखी आहेत...