आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsapp Pic Of Supercop With Bjp Symbol Goes Viral

बिहारचे सुपर कॉप शिवदीप लांडे, Mail-Facebook वर रोज येत होते लग्नाचे प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. मात्र विधानसभेत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार सर्व डावपेच वापरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने एक पोस्टर तयार केले आहे, ज्यात बिहारमधील दबंग पोलिस अधिकारी महाराष्ट्राचा सुपुत्र आयपीएस शिवदीप लांडेच्या बदलीवरुन मुख्यमंत्री नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच या पोस्टरवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ देखील छापण्यात आले आहे आणि पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिहार पोलिसमधील सुपर कॉप म्हणून प्रसिद्ध आयपीएस लांडेचे हे फोटो सध्या बिहारमध्ये व्हायरल झाले आहेत.
बिहार पोलिसमधील सुपर कॉप आयपीएस शिवदीप लांडे हे त्यांच्या अभिनव ऑपरेशन्समुळे नेहमीच चर्चेत राहातात. निधड्या छातीचा हा अधिकारी बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. ते ना कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावात येतात ना गुन्हेगाराला दया दाखवतात. त्यांच्या कामामुळे ते जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फॅन्सनी एक फेसबुकवर कित्येक पेज तयार केले आहेत तर त्यांच्या नावाने काही बनावट अकाऊंट देखील आहेत. तरुणींमध्येही शिवदीप लांडेची मोठी क्रेझ आहे. त्यांच्या पर्सनल मेल आणि फेसबुकवर त्यांना रोज लग्नाची मागणी घालणारी पत्रे आलेली असतात.
शिवदीप यांचे सर्वात चर्चित ऑपरेशन
पाटण्याच्या शासकीय विश्रामगृहाजवळ लाच घेताना एका पोलिस इन्स्पेक्टरला शिवदीप लांडेंनी फिल्मीस्टाइलने अटक केली होती. उत्तर प्रदेशचा पोलिस इन्स्पेक्टर पाटण्याच्या दोन व्यापारी भावांना एका जुन्या प्रकरणात त्रास देत होता. केस बंद करण्यासाठी त्याने मोठी रक्कम मागितली होती. दोन्ही भावांनी याची माहिती तत्कालिन शहर पोलिस आयुक्त शिवदीप लांडे यांना दिली. त्यानंतर आयपीएस लांडे यांनी वेशांतर करुन लाचखोर पोलिस अधिकाऱ्याला पकडण्याची तयारी केली. त्यानूसार साधे टी-शर्ट आणि डोक्यावर बिहारी रुमाल गुंडाळून लांडे शासकीय विश्रामगृहाच्या चौकात पोलिस अधिकारी सर्वचंदची वाट पाहात उभे राहिले. सर्वचंद लाचेची रक्कम घेण्यासाठी आल्यानंतर शिवदीप लांडेंनी त्याला अटक केली. मात्र सबळ पुराव्या आभावी नंतर त्याची सुटका झाली. या फिल्मीस्टाइल कारवाईने शिवदीप लांडे मात्र बिहारमध्ये प्रसिद्ध झाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आयपीएस शिवदीप लांडे यांचे बिहारमधील प्रसिद्ध ऑपरेशन