आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मऊ येथे मोदींच्या सभेसाठी कापले गव्हाचे उभे पीक, 20 शेतकऱ्यांना फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपाप्रमुख मायावतींच्या आगामी सभांसाठी त्रास मात्र गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय. उप्रमधील सदर विधानसभा क्षेत्रातील दोन गावांतील २७ गुंठ्यांवरील हिरवेगार उभे पीक येथे होणाऱ्या नेत्यांच्या सभांसाठी कापले.
 
दोन्ही गावांतील जवळपास २० शेतकरी यामुळे प्रभावित झाले आहेत. त्यांचे २७ गुंठ्यांवरील गव्हाचे उभे हिरवेगार पीक कापले गेले आहे. यात शेतकऱ्यांचा आरोप असा आहे की, पीक ऐन भरात असताना ते कापले गेले. 

पीएम मोदी २७ फेब्रुवारी रोजी येथे येणार आहेत. सुरुवातीला त्यांची सभा घोसी विधानसभा क्षेत्रात होणार होती, पण या ठिकाणास अचानक बदलले गेले. यानंतरच छोट्या शरयू नदीजवळील जवळपास २७ गुंठ्यांवरील गव्हाचे उभे पीकच जणू हल्ला केल्याप्रमाणे कापून टाकले गेले. या कार्यक्रमानिमित्त एसपीजी-स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप घेरा टाकून मुक्कामाला बसला आहे. अनेक केंद्रीय नेतेही मऊला पोहोचले आहेत. मऊ शहराजवळच भुजौटीजवळील सभेच्या स्थळावरील २२ गुंठे जमिनीवर सभा आणि ५ गुंठ्यांवर हेलिपॅड बनविले जात आहे.  

बहराईचमध्येही असेच केले गेले होते, थांबवले होते शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न  
बहराईच जिल्ह्यात २३ फेब्रुवारी रोजी पीएम मोदींची सभा होती. रामगाव क्षेत्राच्या चौपाल सागराजवळ ज्या जागेवर मोदींची सभा झाली होती आणि जिथे त्यांचे हेलिकॉप्टर उतरले  त्याच जागेवर गव्हाचे हिरवेगार पीक उभे होते. हे पीक बटाईने मोहंमदपूरच्या राजराणी आणि त्यांचे पती राजितराम यांनी पेरले होते अन् कसले होते.
 
ते पीक तयार झाल्यावर त्यास विकून मुलीचे लग्न करणार होते. पिकाचे बाजारमूल्य बळजबरीने २५ हजार रुपये ठरवून भाजपच्या लोकांनी त्यांना केवळ ८ हजारच रुपये दिले होते. विरोध केल्यावरून नेत्यांनी त्यांना धमक्याही दिल्या होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...