आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका झटक्यात बिल गेट्सपेक्षाही श्रीमंत झाली होती ही महिला, जाणून घ्या आता का घाबरते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - एका झटक्यात बिल गेट्स पेक्षाही श्रीमंत झालेली ही महिला आजही भीतीच्या सावटाखाली जगत आहे. रात्री अचानक झोपेतून उठते आणि दरवाजावर इनकम टॅक्सचे अधिकारी तर आले नाही ना, याची विचारणा करते.

2015 मध्ये एका झटक्यात झाली होती श्रीमंत
- कानपूरमधील उर्मिला यादवचे लग्न 2006 मध्ये रामलखनसोबत झाले होते.
- रामलखन सेक्युरिटी गार्डची नोकरी करतात. त्यांचा दरमहा पगार 5 हजार रुपये आहे.
- एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या उर्मिलाचे स्वप्न फार मोठे होते. तिला आपले कुटुंब सुखी राहावे एवढीच आपेक्षा नव्हती तर समाजातील गरीबांसाठीही काही करण्याची तिची इच्छा होती.
- तिला मुलांच्या नावावर प्रत्येकी 50 लाख रुपये फिक्स करण्याची इच्छा होती.
- त्याशिवाय गरीबांना दान आणि एक मंदिर बांधण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासोबतच गरीबांसाठी एक निवारा उभारण्याचीही तिची इच्छा होती.
- स्वतःसाठी एक बंगला आणि कार एवढेच तिला हवे होते.

अशी झाली होती बिल गेट्स पेक्षाही श्रीमंत
- उर्मिलाने सांगितले, की गेल्या वर्षी जूनमध्ये मी स्टेट बँके ऑफ इंडियाच्या यूपी स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (UPSIDC) शाखेत 1000 रुपयांनी खाते उघडले होते.
- 29 जुलै रोजी पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेत पोहोचले. पासबुकमध्ये एंट्री केल्यानंतर लक्षात आले की अकाऊंटमध्ये 9 लाख 57 हजार कोटी रुपये जमा दिसत आहेत.
- एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यावर जमा असल्याचे पाहून उर्मिलाला धक्का बसला होता. थोडावेळ ती तिथेच बसून राहिली.
- त्यानंतर तिने बँक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली तर त्यांनाही बसल्या जागेवर धक्का बसला.
- साध्या सरळ उर्मिलाने बँक अधिकाऱ्यांना सांगितले, 'साहेब हे पैसे ज्यांचे असतील त्यांना ते घेऊन टाकायला सांगा. चुकून कोणाचे तरी पैसे माझ्या खात्यात आले असले पाहिजे.'
- उर्मिलाच्या पासबुकवर मिस प्रिंट झाल्याचे बँक मॅनेजर श्रीवास्तव यांनी सांगितले होते. ते म्हणाले, 'उर्मिलाच्या पासबुकवर मिस प्रिंट झाले होते. तिच्या खात्यात फक्त दोन हजार रुपयेच होते.'
- उर्मिलाने सांगितले की बँकेच्या चुकीमुळे मला महिनाभर झोप लागली नव्हती. मी आजारी पडले होते. कित्येक दिवस डोक्यामध्ये दुखत राहात होते.
- स्वप्नातही फक्त पैसे दिसत होते. त्या आकड्यामुळे मी भीतीच्या सावटाखाली जगत होते.
- मला वाटत राहायचे की बँकेच्या चुकीमुळे इनकम टॅक्स आणि पोलिस अधिकारी माझ्या दारात आले आहेत.
- मला कोट्यवधी रुपयांची आपेक्षा नाही फक्त आपल्या गरजा पूर्ण होतील एवढेच पैसे मला हवे आहेत.
- उर्मिलाचा पती रामलखन सांगतो, की त्या न मिळालेल्या पैशांमुळे पत्नीला प्रसिद्धी मिळाली मात्र तिची शांतता हरवली. ती कायम भीत राहात होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 9 लाख 57 हजार कोटी रुपये खात्यावर जमा असलेल्या महिलेचे घर...
बातम्या आणखी आहेत...