आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Lucknow's Kaiser Became The Prime Minister Of India

मोदींच्या आधीच 'PM' बनला लखनऊचा कैसर अली, ट्वीटरवर मिळवले हँडल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - लखनऊ येथील कैसर अली नावाच्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने नकळत 'pmoindia' नावाचे ट्वीटर हँडल मिळवले. तो स्वतः एका सोशल नेटवर्किंग साईटचा मालक असला तरी त्याने दुस-या एका साईटच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली. त्यामुळेच लखनऊचा हा विद्यार्थी ट्वीटरवर अर्ध्या तासासाठी 'पंतप्रधान' बनला. तो एक वेब इंटरप्रिन्योर असून picxter.com नावाची सोशल नेटवर्किंग वेबसाईट चालवतो.
त्यानेच त्याची 'पीएम' बनण्याची कथा आम्हाला सांगितली. कैसर म्हणाला की, 20 मे रोजी म्हणजेच बुधवारी त्याला त्याचे ट्वीटर हँडल लहान (कमी शब्दांचे) बनवायचे होते. त्यासाठी तो अनेक शब्द व नावे वापरून पाहत होता. यादरम्यान त्याने उत्सुकतेपोटी PMOIndia टाइप केले. ते त्याला ट्वीटरवर उपलब्ध असल्याचे दिसले. त्याने लगेचच ते आपले ट्वीटर हँडल बनवले.
हे हँडल मिळाल्याने कैसर खूप आनंदी होता. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. ट्वीटरने त्याच्या हँडलचे नाव पुन्हा पूर्ववत केले. कैसर म्हणाला, 'PMOIndia हँडल मिळाल्याने आनंद असला तरी मनाच्या एका कोप-यामध्ये भीतीही होती. मला वाटले जर हे सरकारी अकाऊंट असेल, तर मी एखाद्या संकटात सापडू शकतो. मी आई वडिलांना सांगितले तेव्हा तेही मला रागावले, माझ्या वडिलांनी मला संपूर्ण देशाची माफी मागायला सांगितले व मीही लगेचच माझ्या ट्वीटर अकाऊंटवर सर्वांची माफी मागितली असे, तो म्हणाला.

पुढे वाचा, कोण आहे कैसर अली...