आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड : धर्म संसदेत गोधळ, साई भक्ताला संतप्त संतांनी मंचावरुन खाली उतरविले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/कवर्धा (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील कवर्धा येथे आयोजित धर्म संसदेच्या दुसर्‍या दिवशी (सोमवार) दोन साई भक्त त्यांचे विचार मांडण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर मोठा गोंधळ झाला. संतांनी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. साईभक्तांनी त्यांचे नाव मनुष्य मित्र आणि अशोक असल्याचे सांगितले आहे. मनुष्य मित्र म्हणाले, मी साईंना देव मानतो. हिंदू धर्मात कोणालाही देव म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे साईबाबांविरोधात जे आरोप केले जात आहेत ते थांबले पाहिजे. ते म्हणाले, हे धर्म स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. धर्म संसद काय निर्णय घेते याच्याशी मला काही देणे घेणे नाही. मी साईंना देव मानत आलो आहे, आणि यापुढेही मानेल. त्यांच्या या वक्तव्याने संत संतप्त झाले आणि त्यांनी मनुष्य मित्र यांना मंचावरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
धर्म संसदेच्या पहिल्याच दिवशी 13 आखाडे आणि सर्व शंकराचार्यांनी साईबाबादेव नाहीत, असे एकमताने म्हटले. साईबाबांची पूजा केली जावी की नाही, याचा फैसला होणे बाकी आहे. याचा अधिकार काशी विद्वत पीठाला देण्यात आला आहे.

सोमवारी धर्म संसदेत सात प्रस्ताव पारित झाले.
१ - साईंना देव मानने चूकीचे आहे.
२- गोमातेचे रक्षण केले पाहिजे.
३ - गंगेचा प्रवाह अविरत झाला पाहिजे. बांधाचे अडथळे दूर केले पाहिजे.
४ - स्त्री भ्रूण हत्या चुकीची आहे. महिलांचा सन्मान झाला पाहिजे.
५ - सर्व शाळांमध्ये रामायण आणि महाभारत शिकवले गेले पाहिजे. ज्यामुळे आमचे सनातन संस्कार टिकून राहातील.
६ - समाजात धर्म प्रचारावर भर दिला गेला पाहिजे. भोंदू साधूंवर बहिष्कार टाकला पाहिजे.
७ - हिंदू धर्माला आग्रह आहे, की रामजन्मभूमी लवकर झाली पाहिजे.

छायाचित्र - संतांनी साई भक्ताला हाताला धरून मंचावरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.