आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक : येडियुरप्पांनी असे जिंकवले काँग्रेसला, असे झोपवले भाजपला...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात भाजपचे माजी मुख्यमंत्री व केजेपी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बीएस. येडियुरप्पा यांनी भाजपसह स्वत:ही समुद्रात बुडी मारली आहे. त्यांनी बदला घेण्याचे वृत्तीने भाजपला मारलेच पण ते स्वत:ही त्यातून वाचू शकले नाहीत. येडियुरप्पा यांना आपल्या केजेपीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांचे केवळ 6 उमेदवारच विधानसभेत पोहचले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर, राजकीय विश्लेषक येडियुरप्पाचे वर्णन भाजपमधील 'दुसरे कल्याणसिंग' असा करु लागले आहेत.

येड्डिंनी आपल्या पक्षाच्या अपयशाचा चांगलाच धसका घेतला आहे. निकाल लागल्यापासून ते घराबाहेर पडले नाहीत. तसेच काल दिवसभर त्यांनी मिडियापासून पळ काढला. येडियुरप्पांचा वाढदिवस आता लवकरच असून, त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. तसेच आपल्या समर्थकांनी तो साजरा करु नये असे सांगितले आहे. केजेपी राज्यात तिस-या क्रमांकाचा पक्ष असेल व किमान 40-50 जागा जिंकेल, असे खुद्द येडियुरप्पांना वाटत होते. मात्र पक्षाने 224 पैकी 205 जागा लढवूनही केवळ 6 च जागा जिंकता आल्या आहेत. त्यातच पक्षातील बडे नेते शोभा करंदळजे, रेणुकाचार्य आणि आय. आर. पेरूमल यांचा पराभवही त्यांच्या जिव्हारी लागला आहे. जर या बड्या नेत्यांनाच जनता नाकारत असेल तर पक्ष भविष्यात कसा बांधला जाईल, याची चिंता येडियुरप्पांना सतावत आहे. त्यामुळेच त्यांचा पुरता 'कल्याणसिंग' झाला आहे. उद्या भविष्यात येडियुरप्पा दमून-भागून भाजपमध्ये परतले तरी, त्यांना फारशी किंमत राहणार नाही. त्यामुळेच राजकीय विश्लेषकांनी त्यांच्याबाबत 'भाजपमधील दुसरा कल्याणसिंग' हे केलेले भाकीत खरे ठरते की काय असे सध्यातरी वाटत आहे.

येडि्डंनी असे झोपवले भाजपला- कर्नाटकात भाजपने 40 जागा जिंकल्या. भाजपमधून बाहेर चूल मांडलेल्या येड्डींच्या केजेपीला 6 जागा मिळाल्या. मात्र, 51 जागांवर भाजप-केजेपीला (एकत्रित) विजयी उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली. यात 39 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, तर 10 जागी जेडीएस आणि 2 जागांवर अपक्ष विजयी झाले. येड्डी वेगळे नसते तर भाजपला 40+6+51 = 97 जागा मिळाल्या असत्या. यात कमी फरकाने जिंकलेल्या काँग्रेसच्या 39 जागा कमी झाल्या असत्या तर काँग्रेसची 121 वरून ही संख्या 82 जागावर आली असती. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा फक्त 2 जागा अधिक. त्यातच खाणसम्राट रेड्डी बंधूंचे साथीदार व माजी आमदार श्रीरामुलू यांनीही भाजपला 9 जागांवर फटका दिला. त्यांचे चार उमेदवार विजयी झाले तर 5 जागांवर दुसर्‍या स्थानी राहिले.