आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB वरील मैत्रिणीला भेटायला पाकमध्ये गेला भारतीय तरुण, मग घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकच्या कैदेतील भारतीय इंजिनिअर तरुण हामिद अन्सारी. - Divya Marathi
पाकच्या कैदेतील भारतीय इंजिनिअर तरुण हामिद अन्सारी.
नवी दिल्ली/मुंबई -  दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली पाकिस्तानची महिला पत्रकार झीनत शहजादी नुकतीच सापडली आहे. पाकच्या कैदेतील भारतीय इंजिनिअर हामिद अन्सारीला मदत करताना ती अचाकन बेपत्ता झाली होती. मुक्त पत्रकार म्हणून काम करणारी झीनत हिचे 19 ऑगस्ट 2015 मध्ये अपहरण करण्यात आले होते.
 
अशी आहे भारतीय हामिदची कहाणी...
-मुंबईचा सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातला तरुण पाकिस्तानात एका सामाजिक छळाची शिकार झालेल्या तरुणीची 'मदत' करायला जातो अन् तेथेच त्याला पाक पोलिस पकडतात. ही काही चित्रपटाची कथा नाही, तर सत्यघटना आहे. 
- मुंबईचा इंजिनिअर तरुण हामिद अन्सारी 2012 मध्ये अफगाणिस्तानातून पाकमध्ये अवैधरीतीने गेला होता. तेथे त्याला अटक करण्यात आली. भारताचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवून त्याला कैदेत टाकण्यात आले. पाकिस्तानच्या तुरुंगात हामिद 5 वर्षांपासून खितपत पडलेला आहे. 
 
- मुलगा हरवल्यावर कोणतेही आईवडील जे करतात तेच हामिदच्या आईवडिलांनी केले. त्यांनी सरकार दरबारी, सोशल मीडियावरून हामिदच्या शोधासाठी प्रयत्न चालवले. अशाच प्रयत्नात हामिदची आई पाकिस्तानी मुक्त पत्रकार झीनत शहजादीच्या संपर्कात आल्या होत्या. झीनतने त्यांना मदत करत त्यांच्यामार्फत पाक सुप्रीम कोर्टाच्या मानवाधिकारी सेलमध्ये विनंती करून हामिदच्या शोधासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.
- याचा परिणाम म्हणून, पाक सुरक्षा दलाला कबूल करावे लागले होते की, बेपत्ता हामिद अन्सारी त्यांच्या कस्टडीत आहे.

आई प्राध्यापक, तर वडील निवृत्त बँक मॅनेजर
-त्याच्या सुटकेसाठी त्याच्या प्राध्यापक आई फौजिया अन्सारी अन् निवृत्त बँक मॅनेजर वडील नेहाल अहमद अन्सारी यांनी सरकार दरबारी अनेक अर्जविनंत्या केल्या. ते म्हणाले होते - शेजारी देशातील अधिकाऱ्यांना दया दाखवावी तसेच आमच्या मुलाची माणुसकीच्या आधारावर सुटका करावी, तो निर्दोष आहे. हेरगिरी करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता.
- हामिदचे मोठे भाऊ खालिद अन्सारी हे डेंटिस्ट आहेत.

फेसबुकवरून झाली होती तरुणीशी मैत्री, भेटायला गेला पाकिस्तानात
- हामिद अन्सारी 2012 मध्ये अवैध रीतीने अफगाणिस्तानातून पाकिस्तानात गेला होता. तो तेथे एका तरुणीला भेटायला गेला होता, त्याची तिच्याशी ऑनलाइन ओळख अन् मैत्री झाली होती. पाकिस्तानात गेल्यानंतर मात्र तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि पाकिस्तानी सैन्याने कोर्टात त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला. यात हामिद अन्सारीला दोषी ठरवण्यात आले. तेव्हापासून तो पाकच्या कैदेत आहे.
 
कोण आहे झीनत शहजादी?
झीनतच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, तिचे अपहरण पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने अपहरण केले होते. 
- वास्तविक, झीनत बेपत्ता झालेल्यांसाठी काम करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती बेपत्ता भारतीय हामिद अन्सारीची आई फौजिया अन्सारी यांच्या संपर्कात आली होती.
- याप्रकरणी झीनतने फौजिया यांच्यातर्फे पाक सुप्रीम कोर्टाच्या मानवाधिकारी सेलमध्ये विनंती करून हामिदच्या शोधासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.
- याचा परिणाम म्हणून, पाक सुरक्षा दलाला कबूल करावे लागले होते की, बेपत्ता हामिद अन्सारी त्यांच्या कस्टडीत आहे.
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेल्या भारतीय नागरिक हामिद अन्सारीच्या खटल्यावर काम करत असतानाच तिला बळजबरी दूर करण्यात आले होते. 
- 26 वर्षीय झीनत फ्रिलांसर रिपोर्टर म्हणून काम करत होती. ती 'डेली नई खबर' आणि 'मेट्रो न्यूज' टीव्हीच्या सर्वाधिक संपर्कात होती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, वृत्ताशी संबंधित आणखी फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...