आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Why Reservation For Marathas? They Are Neither A Caste Nor Backward, Says Plea In High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा जातच नाही, तर आरक्षण कशासाठी? हायकोर्टात दाखल याचिकेतील युक्तिवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा ही जातच नाही, मग त्यांना आरक्षण कशासाठी असा युक्तिवाद मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याद्वारे मराठ्यांना सरकारी नोकरी, शैक्षणिक संस्था यामध्ये 16 टक्के आरक्षण देणा-या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान करण्यात आले आहे. मराठा ही जात नाही तर तो एक भाषिक समुदात असल्याचा युक्तीवाद तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठा समाज हा मागास नसून पुढारलेला असल्यामुळे त्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या नियमामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. आरक्षणाचे प्रमाण हे 50 टक्क्याच्या वर जायला नको, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर हायकोर्टामध्ये शनिवारी सुनावणी होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला राज्यातही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही पक्षाला जनतेच्या रोषाला बळी पडून पराभव स्वीकारावा लागू नये, म्हणून तातडीने आरक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चां रंगायला सुरुवात झाली आहे. यानिर्णयाबरोबरच मुस्लीम समाजाच्या आरक्षणामध्ये 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची अपेक्षा असून, हा निर्णय त्यदृष्टीने फायद्याचा ठरणार असल्याची अपेक्षा सत्ताधारी काँग्रेस आघाडीला आहे. शरद पवार यांनीही आम्ही साधू संत नसल्याचे वक्तव्य करून या दिशेनेच राजकारण सुरू असल्याचे संकेत दिले होते.
पुढे वाचा - काय म्हणाले होते, शरद पवार
फोटो - सध्याची आरक्षणाची स्थिती