आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांच्या मृत्यूबाबत गोपनीयता का? तामिळ स्टार गौतमी टाडिमालाचा प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यावरील उपचार व त्यांच्या मृत्यूबाबत तामिळनाडू सरकारने कमालीची गुप्तता का ठेवली, असा प्रश्न तामिळ स्टार गौतमी टाडिमाला यांनी उपस्थित केला आहे. ब्लॉगवर प्रश्न उपस्थित करून गौतमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवले आहे.

जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना साधे भेटण्यासाठी कोणाला परवानगी देण्यात आली नव्हती. एवढी गुप्तता का ठेवण्यात आली? त्यांचा मृत्यू सर्वांसाठी वेदनादायी आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या उपचाराबद्दलची गोपनीयता सर्वांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे. त्याचे उत्तर मिळत नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यांच्यावर उपचार सुरू असतात. त्या बऱ्याही होतात आणि अचानक त्यांचा मृत्यू काय होतो. हे सगळेच अनाकलनीय वाटते. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असल्यासारखे वाटते. त्यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी कोणालाही दिली जात नाही. अनेक मान्यवरांनी रुग्णालयात भेट दिली. परंतु प्रत्यक्ष भेटू दिले गेले नाही. माझ्याप्रमाणेच राज्यातील जनतेलाही त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. लोकशाहीत आपल्या नेत्याबद्दल जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, असे गौतमी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. लोकांना या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असे गौतमी यांनी म्हटले आहे. जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ५ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

काडीमोडानंतर पुन्हा चर्चेत
अभिनेत्री गौतमी या अभिनेता कमल हासन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी होत. ४८ वर्षीय गौतमी व कमल हासन यांच्यात नुकताच काडीमोड झाल्याचे वृत्त आले होते. काडीमोडानंतर गौतमी जयललिता यांच्यासंबंधीच्या पोस्टमुळे आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...