आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवेवर होत्या वखवखलेल्या नजरा, आईने आक्रोश करत सांगितले 5 जणांचे कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधवा राधाचा मृतदेह शेतात सडलेल्या अवस्थेत आढळला. - Divya Marathi
विधवा राधाचा मृतदेह शेतात सडलेल्या अवस्थेत आढळला.
सोनिपत (हरियाणा) - राईच्या चौहान जोशी गावातून 30 सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या विधवा राधाचा मृतदेह बुधवारी गावातील एका शेतात सडलेल्या अवस्थेत आढळला. मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुलीची आई गीताने 5 जणांवर किडनॅप करून तिचा खून केल्याचा आरोप केला आहे. गीता देवी म्हणाल्या, 3 वर्षांपूर्वी त्यांच्या जावयाचा मृत्यू झाला होता. त्याच दिवसापासून मुलीवर या लोकांच्या वखवखलेल्या नजरा पडायला लागल्या.
 
मुलीच्या मोठ्या दिराचा मुलगाच करणार होता दुष्कृत्य
- गीता देवी म्हणाल्या, एक कृष्णा खत्री आहे तो त्यांच्या मुलीवर लग्नाचा दबाव आणत होता. तो तिचा कंपनीपर्यँत पाठलाग करायचा. दुसरा एक व्हॅन चालवणारा मोनू आहे. त्याने 2-3 वेळा त्यांच्या मुलीला किडनॅप केले होते. आणि तिच्या मोठ्या दिराचा एक मुलगा तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा.
- माझी मुलगी या सर्व प्रकारांना त्रासली होती. 16 सप्टेंबरच्या रात्री मुलगी राधा घरी आली नाही तेव्हाही या सर्वांवर त्यांनी संशय घेतला होता.
- पोलिसांनी एकाचीही चौकशी केली नव्हती. एवढेच काय, 21 सप्टेंबरला फक्त बेपत्ता झाल्याची साधी तक्रार नोंदवली होती.
- त्या चौकीत खेटा मारत राहिल्या, पण कोणीच दखल घेतली नाही. एक पोलिस कर्मचारी तर सारखा म्हणायचा- हे हरियाणाचे पोलिस आहेत, दिल्लीचे नाही- आम्ही आमच्या मर्जीने कारवाई करू.
 
साहेब, आता या 3 लेकरांना पोलिस सांभाळतील का?
- मृत राधाची बहीण निकिताने रडत-रडत सांगितले की, तिच्या बहिणीला 3 मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा 12 वर्षांचा, दुसरा 10 तर तिसरा 8 वर्षांचा आहे.
- माझ्या बहिणीच्या पतीचे 3 वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. ती फॅक्ट्रीमध्ये काम करून आपल्या मुलांचे पालनपोषण करत होती.
- आता तिन्ही मुले अनाथ झाली आहेत. एएसपी साहेब, बहिणीचा पोलिसांनी शोधच घेतला नाही, आता मृतदेह आढळलाय. आता या मुलांचा सांभाळ पोलिस करतील का?
- आम्हाला याचे उत्तर पाहिजे. दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
 
गावकऱ्यांवरही काढला राग, आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप
- मृत राधाची आई, बहीण निकिता आणि भाऊ युवराज यांनी म्हटले की, आम्ही पोलिसांना 5 जणांची नावे दिली होती. यात छोटू राम, कृष्ण खत्री, विजय आणि जेठजीचा मुलगा बिलू आहेत.
- पोलिसांनी यापैकी एकाचीही चौकशी केली नाही. आम्ही आधीच संशय व्यक्त केला होता की, बहिणीच्या जिवाला धोका आहे.
- मृत राधाचा भाऊ युवराजने पोलिस आणि गावकऱ्यांवरही राग काढला. तो म्हणाला, गावातील लोक आरोपींचा बचाव करत आहेत.
- त्यांच्या बहिणीला त्रास दिला जात होता तेव्हा गावातला कोणीच मदतीसाठी पुढे आला नाही. 
- असे निष्ठूर गाव कुठेच नसेल. बुधवारी बहिणीचा मृतदेह आढळला तेव्हा गावातले लोक व्हिडिओ बनवायला आले. सगळे मिळालेले आहेत. गरिबांचा कुणीच वाली नसतो.
- इकडे, मुलीचा मृतदेह पाहून आईने प्रचंड आक्रोश केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...