आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी दूर जात होतो- ती हट्ट करत होती; म्हणून चिडून केला गँगरेप, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले अॅसिड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दोघांनी महिलेवर बलात्कार करून प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड टाकले. - Divya Marathi
या दोघांनी महिलेवर बलात्कार करून प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड टाकले.
अलाहाबाद - येथील घुरपूर परिसरात एका कॉलेजमध्ये काम करणाऱ्या महिला सफाइ कर्मचाऱ्यावर कॉलेजच्याच ड्रायव्हरने आपल्या साथीदारांसह मिळून गँगरेप केला. नराधमांनी यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड टाकले.
-गंभीररीत्या भाजलेली ही महिलेला 3 मुले असून ती विधवा आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी महिलेची तब्येत चिंताजनक झाल्याचे पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. 
-आरोपी म्हणाला, "आमचे अफेअर होते. माझे लग्न ठरले. यामुळे मी तिच्यापासून अंतर ठेवू लागलो होतो, पण ती जवळ येण्याचाच हट्ट करू लागली. म्हणून परेशान होऊन मी असे केले."
 
मुलांच्या पालनासाठी महिलेने सुरू केली होती नोकरी
- घुरपूर परिसरातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेचे पती 3 वर्षांपूर्वी एका अपघातात वारले.
- त्या वेळी तिच्यासमोर 3 मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. काही जणांनी शिफारस करून तिला जवळच्याच एका कॉलेजमध्ये सफाई कर्मचारी म्हणून लावून दिले.
- या पगारातून ती मुलांचे पालनपोषण करू लागली.
 
ड्रायव्हरने दसऱ्याच्या दिवशी महिलेला बोलावले शाळेत
- पीडिता म्हणाली, ती जास्त शिकलेली नाही. त्या शाळेत 22 वर्षीय पंचराज हा ड्रायव्हर म्हणून काम करतो.
- दसऱ्याच्या दिवशी शाळा बंद होती, पण मला याची माहिती नव्हती. याचा फायदा घेऊन पंचराजने तिला शाळेत बोलावले. ती सकाळीच शाळेत पोहोचली. तिथे पंचराज तिला भेटला. त्याने तिला बसवून ठेवले.
- काही वेळाने इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्यावर शाळेच्या मागे बगिच्यात नेले. तिथे त्याचा साथीदार कल्लू आला. दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
 
प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले अॅसिड
- एवढेच नाही, पंचराजने बॉटलमध्ये अॅसिड घेऊन तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या इतर भागांवर टाकून दोघेही फरार झाले. अॅसिडमुळे पीडित गंभीररीत्या भाजली.
- कशीबशी ती आपल्या घरी पोहोचली. तिथून गावकऱ्यांनी तिला घुरपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये नेले. परंतु पोलिसांना त्यांना पिटाळून लावले.
 
तब्येत बिघडल्यावर पोलिसांनी घेतली दखल
- यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. 2 दिवस तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु तब्येत आणखीनच बिघडली.
- कुटुंबीयांनी तिला 2 ऑक्टोबरला मोतीलाल नेहरू रुग्णालयात नेले. प्रकरण तापत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दखल घेऊन महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आणि पंचराज व कल्लूला अटक केली.
- महिलेने आणि तिच्या आईने पोलिसांना न्याय देण्याची विनवणी केली असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आरोपींनी दिलेला जबाब आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...