आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधी पाहिली नसेल अशी होळी, वृंदावनमध्ये विधवांनी अशी केली रंगांची उधळण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृंदावन/आग्रा- मथुरा आणि वाराणसीत वैधव्यात जगणाऱ्या 500पेक्षा महिलांनी प्रथमच वृंदावनच्या श्रीकृष्ण मंदिरात होळी खेळली. पश्चिम बंगालसह इतर शहरातील विधवांही यात सहभागी झाल्या. विधवांनी पहिल्यांदा मोठा सामाजिक बदल घडवून आणला असून 140 टन गुलाल व फूलांची उधळण केली.

काही महिलातर बालपणी झाल्या होत्या विधवा...
- पश्चिम बंगालमधून आलेल्या राजेश्‍वरी यांनी सांगितले की, त्या बालपणीच विधवा झाल्या होत्या.
- आयुष्यात पहिल्यांदा होळी खेळल्याचे राजेश्वरी यांनी सांगितले.
- होळी खेळण्यासाठी आलेल्या सर्व महिलांची व्यवस्था येथील गोपीनाथ मंदिरात करण्यात आली होती.
- सुलभ इंटरनॅशनलने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कृष्‍णाच्या भक्तित रंगाचे मोठे योगदान..
- मथुरा येथे गोपीनाथ मंदिरात अशी अनोखी होळी पहिल्यांदा साजरी करण्‍यात आली.
- सुलभ इंटरनॅशनलचे वृंदावन शाखेचे प्रभारी विनीता वर्मा यांनी सांगितले की, यंदाची होळी विधवांच्या आयुष्यांत नवा रंग भरणार आहे.
- देशात विधवांना होळीपासून लांब ठेवले जाते. त्यांना संपूर्ण आयुष्य वैधव्यात जगावे लागते.
-- कृष्‍णाच्या भक्तित रंगाचे मोठे योगदान असल्याचे विनीता वर्मा यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा, वृंदावनमध्ये होळी खेळण्यात दंग झालेल्या विधवांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...