आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

47च्या वयात जडले 17 वर्षाच्या बहिणीवर प्रेम; बॅंक मॅनेजरने केली पत्नी-मुलाची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर- झारखंडमधील एका बॅंकेच्या वरीष्ठ व्यवस्थापकाच्या पत्नी आणि 4 वर्षीय मुलाची निर्घृण हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. डिमना मार्गावरील डी-चौधरी मधुसूदन कॉम्प्लेक्समध्ये मागील आठवड्यात झालेल्या या दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाईंड दुसरा-तिसरा कोणी नसून या महिला पती आहे. त्याने सुपारी देऊन पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. शशिकुमार प्रसाद (47) असे आरोपीचे नाव असून तो इंडियन ओव्हरसीज बॅंकेत उच्चपदावर कार्यरत आहे.

मावस बहिणीवर जडले होते शशिचे प्रेम...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फ्लॅटच्या बेडरूममधून मंजू आणि द्विजचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. या दुहेरी हत्येप्रकरणी शशि प्रसादवर पोलिसांचा आधीपासून संशंय होता. पोलिस त्याच्यावर लक्ष ठेऊन होते.
-सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी शशिला अटक केले.
- पत्नी मंजू देवी (35) आणि मुलगा द्विज (4) याची हत्या केल्याचे शशि प्रसाद कबूल केले आहे.
-शशिने सांगितले की, गुजरातमध्ये राहाणार्‍या 17 वर्षीय मावस बहिणीवर त्याचे प्रेम जडले होते. ती देखील त्याच्या प्रेम करत होती.
-दीड वर्षापासून दोघे एकमेकांना भेटत होते. शशिला तिच्यासोबत विवाह करायचा होता. यासाठी त्याने पत्नी मंजू आणि द्विजची हत्या केल्याचे कबूल केले आहे.
दोन महिन्यांपूर्वी रचला होता पत्नी-मुलाच्या हत्येचा कट...
-शशिने दोन महिन्यांपूर्वी पत्नी-मुलाच्या हत्येचा कट रचला होता. शशिने बॅंकेचे व्यवस्थापक मोहन शर्मा आणि मुकेश शर्माला पाच लाख रुपयांत पत्नी आणि मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती.

दत्तक मुलाचा करत होता द्वेष...
- एसएसपी अनूप टी मॅथ्यू यांनी सांगितले की, शशि कुमार द्विज याचा कायम द्वेष करत होता.
- मंजुच्या हट्टामुळे त्याने द्विज याला गुवाहाटीमधून दत्तक घेतले होते. मोठा झाल्यानंतर संपत्ती हक्क सांगेल म्हणून त्याला शशिने ठार मारले.

भाऊ-बहिणीचे नाते असल्याने संशय आला नाही...
- शशि त्याच्या प्रेयसीसोबत (मावस बहीण) कायम फोनवर बोलायचा.
-दोघे नात्याने भाऊ-बहीण असल्याने त्यांच्यावर कोणाचा संशय आला नाही. मंजू देखील पतीच्या प्रेमसंबंधाबाबत अनभिज्ञ होती.
-शशिला माहीत होते की, मंजू कधी आई होऊ शकत नाही. यासाठी त्याने मावस बहिणीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवले होते.
- पोलिसांनी शशिचे त्याच्या प्रेयसीचे अनेक फोटोज घरातून ताब्यात घेतले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...